Shrikant Deshmukh: सोलापूर भाजपच्या श्रीकांत देशमुखांनी लग्न लपवलं? कोण आहेत देशमुख ज्यानं भाजपही अडचणीत?
कुस्तीप्रेमी म्हणूनही त्यांची जशी ओळख आहे तशीच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्यानंतर त्यांनीच तो प्रकार घडवून आणल्याचेही त्यानंतर सिद्ध झाले होते त्यामुळे ज्यांनी लग्न झाल्याचं लपवलं आहे त्या देशमुखांमुळे सोलापूरमधील भाजप मात्र अडचणीत आले असल्याच्या चर्चेला आता उधाण आल आहे.
सोलापूरः शिवसेनेतून बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहाटी असा प्रवास करणाऱ्या बंडखोर आमदार शहाजी पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर, काय हाटील ही ऑडिओ क्लिप व्हायरल (clip Viral) झाल्यानंतर सांगोला चर्चेत आले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रीकांत देशमुख यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आणि सोलापूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बेडरूममधील त्या व्हिडीओने श्रीकांत देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्ष (District President) पदावरून पायउतार व्हावं लागलं. ते श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) सोलापूरच्या राजकारणात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले नाव आहे.
कुस्तीप्रेमी म्हणूनही त्यांची जशी ओळख आहे तशीच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्यानंतर त्यांनीच तो प्रकार घडवून आणल्याचेही त्यानंतर सिद्ध झाले होते त्यामुळे ज्यांनी लग्न झाल्याचं लपवलं आहे त्या देशमुखांमुळे सोलापूरमधील भाजप मात्र अडचणीत आले असल्याच्या चर्चेला आता उधाण आल आहे.
श्रीकांत देशमुखांना 2014 ची विधानसभेची उमेदवारी
देशात 2014 मध्ये ज्यावेळी सत्तांतर झाले, भाजपची लाट देशात पसरू लागली होती, त्यावेळी श्रीकांत देशमुख यांना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आले होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या झालेल्या अनेक कार्यक्रमातून त्यांनी पुढाकार घेत भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची धूरा त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा श्रीकांत देशमुख हे नाव चर्चेत राहिले होते.
भाजप जिल्हाध्यक्ष पदाची धूरा
श्रीकांत देशमुख यांची राजकीय वाटचाल सोलापूर जिल्ह्यासाठी नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी कुस्तीचे फड तर कधी विठ्ठल मंदिराजवळ आंदोलन केले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावणे या अशा राजकीय डावप्रतिडावामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन वर्षापूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धूरा देण्यात आली होती. त्यानंतर पंढरपूरात झालेल्या आंदोलनावेळी तुषार भोसले यांच्या समर्थनाथ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावल्यानंतर ते त्यावेळीही प्रचंड चर्चेत आले होते. अशा आंदोलनात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धूरा आपल्या खांद्यावर असल्याचे सांगत भाजपसाठी सोलापूरात जोरदारपण पुढाकार घेतला होता.
श्रीकांत देशमुखांवर गोळीबार; नंतर बिंग फुटले
श्रीकांत देशमुख नावाची चर्चा नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे सोलापूरच्या राजकारणात केली जाते, 2014 मध्येही त्यांचे नाव प्रचंड चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांना भाजपकडून सांगोला विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. त्या निवडणुकीचा प्रचारही जोरदार चालू होता. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाल्याच्या वृत्ताने सोलापूरसह राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती. त्या घटनेनंतर त्याचा तपास केल्यानंतर तो गोळीबार नव्हता तर तो त्यांनीच घडवून आणलेला प्रकार होता हे स्पष्ट झाले होत.
तुषार भोसलेंसाठी राष्ट्रवादीबरोबर वाद
भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती, त्यावेळी पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुषार भोसले यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना परतवून लावण्यात आणि त्यांनाही जशास तसे उत्तर देण्याच्या प्रकारावरून श्रीकांत देशमुख चर्चेत आले होते. त्या सर्व प्रकारानंतर आता त्यांच्या दोन व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांना सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.