शरद पवारांना वारंवार भेटणाऱ्या नेत्यावर अजितदादांची कारवाई; जाहीर सभेत म्हणाले…

Ajit Pawar Solapur Sabha Speech : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोलापूरमध्ये सभा झाली. या सभेत अजित पवार विविध मुद्द्यांवर बोलले. राष्ट्रवादीचा एक नेता वारंवार शरद पवारांना भेटत होता. शिवाय आता शरद पवार गटाचा प्रचार करतानाही दिसत आहे. यावर अजितदादा बोललेत. वाचा...

शरद पवारांना वारंवार भेटणाऱ्या नेत्यावर अजितदादांची कारवाई; जाहीर सभेत म्हणाले...
अजित पवार, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 2:36 PM

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. काहींनी शरद पवार गटात प्रवेश केला. असंच एक नाव म्हणजे सोलापूरच्या मोहोळचे उमेश पाटील… अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी शरद पवार यांची दोनदा भेटी घेतली. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश देखील केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्राचारार्थ प्रचार उमेश पाटील दौरा करत आहेत. त्यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निशाणा साधला आहे.

अजित पवार मोहोळमध्ये बोलत असताना उपस्ठित स्थानिक लोकांमधून अजित पवारांना उमेश पाटील यांच्यावर बोला असा आवाज आला. मग अजित पवारांनीदेखील त्यांच्या स्टाईलने उमेश पाटलांवर एका वाक्यात निशाणा साधला. त्याला पक्षातून काढून टाकेलेलं आहे. आधी मतदान करा, असं अजित पवार म्हणाले.

जयंत पाटील यांच्या भाषणावर काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल यांनी प्रचार सभेत 3 बोट दाखवून राजू खरे यांना निवडून देण्याचे आवाहन केलं होतं. मात्र राजू खरे यांचा EVM वर नंबर 1 आहे. त्यावर अजित पवार बोललेत. जयंत पाटील यांचं नाव न घेता संदर्भ देत अजित पवारांनी भाष्य केलं. काल एका पक्षाचे अध्यक्ष आले आणि त्यांनी इशारा केला.. 3 बोटं दाखवली. त्यामुळे आपल्या यशवंताचा नंबर 3 आहे. समझनेवालों को इशारा काफी है…, असं अजित पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असा ठराव आम्ही केला. आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. विदर्भ, कोकण इथे तर मिळतच आहे. फक्त मराठवाड्यात अडचण आली होती. कारण तो निजामाच्या राज्यात होता. पण आम्ही त्याबाबत काम करतोय आणि त्याचे रेकॉर्ड तपासत आहेत. तरीही काहींचं म्हणणं आहे की आम्हाला सरसकट ओबीसीतून पाहिजे. तर ओबीसी म्हणतात आम्हालाच अजून संधी मिळत नाही. मराठा समाजाला कशाला त्यात आणता? त्यामुळे त्यावर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. ते यावर काम करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.