प्रश्न मानपानाचा होता; कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी या पट्ट्यानं किती पैसे मोजावेत, आधी बातमी वाचा

आर्क्सेस्ट्राच्या कार्यक्रमाच्या उद्घघाटनचा नारळ फोडण्यासाठी बोली लागलेलं सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील पहिलं गावं ठरले आहे. त्यामुळे या बोलीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रश्न मानपानाचा होता; कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी या पट्ट्यानं किती पैसे मोजावेत, आधी बातमी वाचा
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:04 PM

सोलापूर : हौसेला मोल नाही म्हणतात ते खरचं आहे. हौस मग ती कोणतीही असो एकदा काय मनात हौस आली की, ती मिळवण्यासाठी माणसं काहीही करतात. त्याचाच प्रत्यत सोलापूर जिल्ह्यात एका गावात आला आहे. त्यातच मानपानाच्या गोष्टी आल्या की काही माणसं इरेला पेटतात, आणि मापानाचा बहुमानही मिळवून दाखवतात. त्याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड गावातील भगवान लटके नावाच्या व्यक्तीने घेतला आहे. आणि गावातील मानाची बोली आपल्या नावावर कोरून ठेवली आहे.

केवड गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी बोली लावण्यात आल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले होते. त्यामुळे याच मान पानासाठी कोण कुठल्या स्तराला जाऊ शकते.याचं सचित्र माढा तालुक्यात पाहायला मिळाले आहे.

कोणत्याही गावात माणसं आपल्या हौसेसाठी कधी काय करतील सांगता येणार नाही. मग ती हौस मानापानाची असेल तर मग लोकं काहीही करु शकतात.

मात्र सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या केवड गावात झालेल्या बोलीची सर्वत्र चर्चा सुरू झाले आहे. सध्या महाराष्ट्र भरातील ग्रामीण भागात यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

त्यापैकी एक असलेल्या केवड गावात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा म्हणजेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यासाठी अर्थात नारळ फोडण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील काळ भैरवनाथ मंदिरातच बोली लावली होती.

या बोलीत ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी तब्बल 55 हजार रुपये मोजण्यात आले आहेत. आणि त्याचे मानकरी आहेत, भगवान नरहरी लटके.

लटके हे पेशाने शेतकरी असून लटकेना मान मिळताच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात करुन स्वागत करुन लटकेना खांद्यावर उचलुन जल्लोष केला आहे. नारळ फोडण्याचा क्षण काही सेंकदाचा असणार आहे, मात्र मान पानासाठी ग्रामीण भागातील मंडळी आजही किती हट्टी असतात त्याचेच हे जीवंत उदाहरण.

आर्क्सेस्ट्राच्या कार्यक्रमाच्या उद्घघाटनचा नारळ फोडण्यासाठी बोली लागलेलं सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील पहिलं गावं ठरले आहे. त्यामुळे या बोलीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.