धक्कादायक: पहाटेच चूल पेटली, ठिणगी उडाली, झोपडीत भडका, आजीबाई आजोबांना उठवायला गेल्या अन्…

झोपडीतील सर्वच वस्तूंनी पेट घेतल्याने नेमका कुठून मार्ग काढायचा हे कळलं नाही अन् या दोघांनाही भीषण आगीनं त्यांना कवेत घेतलं.

धक्कादायक: पहाटेच चूल पेटली, ठिणगी उडाली, झोपडीत भडका, आजीबाई आजोबांना उठवायला गेल्या अन्...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 12:50 PM

सागर सुरवसे, सोलापूरः बार्शी तालुक्यातून एक दुर्दैवी अन् धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपडीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावर अत्यंत वाईट स्थिती ओढवली. झोपडीतल्या आजी पहाटेच उठल्या होत्या. पण चुलीतली ठिणगी उडून इतर वस्तूंवर पडली अन् पाहता पाहता आजूबाजूच्या वस्तू, अख्ख्या झोपडीलाच आग लागली. चूल पेटवून बाहेर पडलेल्या आजीबाईंना हा भडका दिसला. झोपडीत झोपलेल्या आजोबांच्या जीवाला धोका आहे, हे ओळखून त्या तडक तिकडे धावल्या. पण आगीच्या भडक्याने दोघांनाही कवेत घेतलं. बाहेर पडण्यात अपयश आलं अन् या भीषण घटनेत या दोघांचाही अंत झाला.

कुठे घडली घटना?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली. या आगीत भीमराव काशीराम पवार आणि कमल भीमराव पवार या दोघांचा करुण अंत झाला.

काही क्षणात आगीचं रौद्ररुप

सदर घटनेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसासर, गाडेगाव येथे भीमराव आणि कमल पवार यांची झोपडी होती. आज सकाळी पहाटेच कमल पवार यांनी गरम पाणी करण्यासाठी चूल पेटवली. त्यानंतर त्या काही कामासाठी झोपडीच्या बाहेर गेल्या. काही मिनिटातच त्यांच्या झोपडीने अचानक पेट घेतल्याचं दिसलं. पती भीमराव पवार तिथेच झोपलेले असल्याने त्यांना उठवून बाहेर काढण्यासाठी म्हणून कमल यांनी थेट आगीच्या लोळांतून मार्ग काढत झोपडीत प्रवेश केला. पण झोपडीतील सर्वच वस्तूंनी पेट घेतल्याने नेमका कुठून मार्ग काढायचा हे कळलं नाही अन् या दोघांनाही भीषण आगीनं त्यांना कवेत घेतलं. पहाटेचीच वेळ असल्याने आजूबाजूच्यांना याची खबर लागली नाही अन् या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लासलगावात चौघांचा मृत्यू

तर नाशिकमधील अन्य एका घटनेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लासलगाव ते उगाव स्टेशनदरम्यान हा भीषण अपघात झाला. रेल्वेचे हे कर्मचारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे लाइन दुरूस्त करण्यासाठी ते ट्रॅकवर गेले होते. मात्र लाइन दुरूस्त करणाऱ्या इंजिननेच धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्माराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ या चौघांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघात घडल्यानंतर स्टेशन परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे नाशिक स्टेशनकडे जाणाऱ्या आणि तिथून निघणाऱ्या रेल्वे गाड्यांचा काही काळ खोळंबा झाला होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.