तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जोरदार टीका; म्हणाले, तुताऱ्या वाजवा नाहीतर…

BJP Leader Chandrkant Patil on NCP Sharad Pawar Group symbol Tutari : तुतारी चिन्हाच्या अनावरणाच्या दिवशी भाजप नेत्याची राष्ट्रवादी शरद पवार गटावर जोरदार टीका... मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणावर भाजप नेत्याची सविस्तर प्रतिक्रिया... वाचा सविस्तर...

तुतारी चिन्हाचं अनावरण होत असतानाच भाजप नेत्याची जोरदार टीका; म्हणाले, तुताऱ्या वाजवा नाहीतर...
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 11:49 AM

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. किल्ले रायगडावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.

विरोधकांवर टीकास्त्र

तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. परंतु महाराष्ट्रात 45 आम्ही म्हणत होतो, पण तेही आता आम्ही क्रॉस करू अशी दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदींची जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे. आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळाले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

विजयाचा विश्वास

मध्यप्रदेशच्या इतिहासात भाजपला एवढी मोठी यश मिळाले होते. हमको लाभ मिला है तुम जो करना है तो करो. पण निवडणुकीत शेवटपर्यंत विरोधी पक्षाने हार मानायची नसते. विरोधी पक्ष किंवा शरद पवारही म्हणतातआमच्या 20-22 जागा येणार आहेत. मात्र राज्यात महायुती 48 पर्यंत जाईल असे वाटतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले?

दिल्ली शेतकरी आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.