ही तर पुढाऱ्यांची स्टंटबाजी; सातपूते आणि जानकर गटाचा दावा काय? मारकडवाडीत चाललंय तरी काय?

Markadwadi Ballot Paper Election News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत सध्या राजकारण तापलेलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार या ठिकाणी सकाळीच दाखल झाले आहेत. ईव्हीएमविरोधात गावकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ते आले आहेत. तर दुसरीकडे गावात पण दोन गट असल्याचे समोर येत आहे...

ही तर पुढाऱ्यांची स्टंटबाजी; सातपूते आणि जानकर गटाचा दावा काय? मारकडवाडीत चाललंय तरी काय?
मारकडवाडी बॅलेट पेपर
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 10:38 AM

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ईव्हीएमविरोधातील जन आंदोलनाचा राष्ट्रीय केंद्रबिंदु ठरण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचीत आमदार उत्तम जानकर यांना मतदान केलेले असताना त्यांना कमी मतदान कसं झालं असा सवाल मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केला होता. तर गेल्या आठवड्यात त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न पण केला होता. दरम्यान महायुती सरकारच्या काळातील पहिल्याच विशेष अधिवेशनात मारकडवाडीचा मुद्दा गाजला. ज्येष्ठ नेते शरद पवार या ठिकाणी सकाळीच दाखल झाले आहेत. ईव्हीएमविरोधात गावकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ते आले आहेत. तर दुसरीकडे गावात पण दोन गट असल्याचे समोर येत आहे…

बॅनरवरून जोरदार वाद

मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानाची हाक दिल्यानंतर याच गावात राम सातपुते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे विकासाचा आलेख सांगणारा एक बॅनर लावण्यात आला. त्याची एकच चर्चा राज्यभर झाली. तर दुसरीकडे गावातील अनेक गावकरी हे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा आग्रह करत आहेत. तर पोलीस आणि प्रशासन हक्क डावलत असल्याचा आरोप केला. तर आता शरद पवार हे नुकतेच मारकडवाडीत दाखल झाले. त्यावेळी हा बॅनर झाकण्याचा प्रयत्न बाहेरील लोकांनी केल्याचा आरोप राम सातपूते समर्थकांनी केला. त्यावरून गावात दोन गट असल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार मारकडवाडीत दाखल

मारकडवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार आज सकाळीच मारकडवाडीत दाखल झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयंत पाटील हे गावात लोकांचे मत काय आहे, त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेत आहे. त्यासाठी गावातील नागरिकांना बोलते करण्यात येत आहे. याठिकाणी ग्रामस्थ त्यांची बाजू मांडत आहे.

बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी

आमदार उत्तम जानकर आणि राम सातपूते यांचे समर्थक या गावात आहेत. दोन्ही गट त्यांची बाजू हिरारीने मांडत आहेत. विकास कोणत्या पुढाऱ्याने केला आणि किती निधी आणला याची गावात चर्चा सुरू झाली. दोन्ही गट त्यांच्या नेत्याची बाजू उचलून धरत आहे. तर ईव्हीएम विरोधातील गट आक्रमक झाला आहे. दुसरीकडे सातपूते समर्थकांनी बॅलेट पेपरवरील निवडणुकीला तयारी असल्याचे म्हटले आहे. सध्या गावात काही बाहेरील नेते आणि पुढाऱ्यांची स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तर अनेकांनी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.