विशाळगडाजवळच्या गजापूर गावातील नासधूस हा पूर्वनियोजित कट…; शरद पवार गटाच्या नेत्याचा थेट आरोप

Jayant Patil on Vishalgad Attack News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात झालेल्या हल्ल्यावर भाष्य केलं. हा पूर्वनियोजित कट असल्याचं जयंत पाटील म्हणालेत. त्याचबरोबर विशाळगड परिसरातील अतिक्रमणावरही जयंत पाटील बोललेत. वाचा सविस्तर...

विशाळगडाजवळच्या गजापूर गावातील नासधूस हा पूर्वनियोजित कट...; शरद पवार गटाच्या नेत्याचा थेट आरोप
शरद पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 6:53 PM

कोल्हापुरातील विशाळगडाच्या पायथ्याशी एक घटना घडली अन् त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभर उमटले. विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गजापूर गावातील घरांवर अचानकपणे हल्ला करण्यात आला. यात स्थानिकांच्या घरांचं- रोजच्या वापरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या सगळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. गडापूरवरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. तिथे जाऊन दंगा – गोंधळ करायचं हे ठरलेलं असावं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणालेत.

“अतिक्रमणाला विरोध नाही, पण…”

विशाळगडावरील अतिक्रमण दूर करावं, यासाठी अनेक शिवप्रेमी हे बराच काळ मागणी करत होते. तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या अगोदर दूर करणे गरजेचं होतं. आता ऐन पावसात तिथल्या लोकांना कुठे हलवायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. यावर काही लोकांनी कोर्टातून स्टे आणला होता. त्यामुळे तिथल्या 12-13 घरांना काढणं शक्य नव्हतं, मात्र उरलेल्यांना काढावं असे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत. पावसाळ्यात अशा लोकांना तिथून काढून टाकणं हे योग्य नाही. मात्र अतिक्रमाणाला आमचा पाठिंबा नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

विशाळगडावरचं अतिक्रमण हे दूर झालंच पाहिजे, याबद्दल कोणतीही शंका नाही. अतिक्रमण काढण्यासाठी जे पायथ्याशी लोक आले त्यांनी तिथल्या नजदीकच्या गावामध्ये जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला करणं. त्यांच्या घरांची नासधूस करणं, तिजोऱ्या फोडणं आणि मालमत्ता लुटणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अपेक्षित नव्हतं, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

“हा तर पूर्वनियोजित कट”

लोकांच्या घरावर हल्ला करण्याचं काम शिवप्रेमी करू शकत नाहीत. त्यामुळे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कलम 153 आणि अधिक कडक कलम लावली पाहिजेत. काळ सोकावू नये अशी आमची अपेक्षा आहे. पोलीस यामध्ये जनतेला संरक्षण देण्याबाबतीत अपयशी ठरले. फक्त 2 ते 3 पोलीस हे तिथं उघड्या डोळ्यांनी काय होत आहे ते बघत होते. मोठी कुमक लगेच मागवून गुंडांचा हौदास सुरु असणारा पूर्णपणे थांबवता आला असता, आता आमची मागणी आहे. हा पूर्वनियोजित कट होता, तिथे जाऊन दंगा – गोंधळ करायचं हे ठरलेलं असावं. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केलीय.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.