केल्यालं मतदान कुठं गेलंय ते आम्ही हुडाकतुय…; मारकडवाडीतील ग्रामस्थ संतापले

Markadvadi Villagers Reaction About Voting : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. या गावातील लोकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर बातमी....

केल्यालं मतदान कुठं गेलंय ते आम्ही हुडाकतुय...; मारकडवाडीतील ग्रामस्थ संतापले
मारकडवाडीत मतदान होणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 10:22 AM

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आहे. मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध केला आहे. मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तरिही मारकडवाडी गावातील नागरिक मतदानासाठी दाखल झाले आहेत. यावेळी एका वयस्कर आजोबांनी मनातील खंत बोलून दाखवली. 20 तारखेला मतदान झालं पण आमच्या मनासारखं झालं न्हायी म्हणून आम्ही हितं बसलुया… पहिल्या पासनं मारकडवाडीचं मतदान चांगलं हुतं आण आता ह्या बारीनं चांगलं झालं न्हाय. म्हणूनच आम्ही मतदान घितुया, असं एका वयस्कर आजोबांनी म्हटलं.

आजोबांचं म्हणणं काय?

पुलिसांच्या काय बापाचं भ्या हाय. आमचं मतदान हाय. आम्हाला मतदान कराचंच हाय. आम्ही पुलिसाला भितू व्हय तव्हा…. आम्हाला आडवलं. मारलं तरी मी मतदान करणार हाय. आमची चीड का, तर आमचं लीडवर गाव असताना आमचं मतदान कुठं गेलंय ती मतदान आम्ही हुडाकतुय, असंही ते म्हणाले. माझं वय 80 च्या वर झालंय. पहिल्यापासनं मतदान केलंय. इंदिरा गांधीच्या काळापासनं मतदान करतुया. आम्हाला मतदान कसं करायचं ते शिकायला 15 दिवस लागलं हुतं… आसं शिकून मतं दिल्यातीया आण आता ही आलं अन् बटान दाबलं की कुठं मतदान गेलंय ते आम्हाला काय माहितीय तव्हा, असंही या आजोबांनी म्हटलं आहे.

मारकडवाडी गावात ज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गावात आधीपासून उत्तमराव जानकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये उत्तमराव जानकर यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जास्त मतं मिळाली. त्यामुळे मारकडवाडीच्या नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. या गावात आज पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे.

मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया दहा मिनिटात सुरू होणार आहे. संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानप्रकिया राबविणार आहेत. आमदार उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते भानुदास सालगुडे पाटील म्हणाले आहेत.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.