sikandar shaikh : मोहोळ पैलवान सिकंदर शेखची ओपन जीपमधून रॅली, नागरी सत्कारासाठी शेकडो मोहोळकर रस्त्यावर
मागील पंधरा वर्षापासून मी पैलवानकीसाठी अपार कष्ट घेत आहे. त्यानंतर मला आज हे यश मिळालेलं आहे. मात्र असं असलं तरी मला अजून खूप काम करायचे आहे.
सोलापूर – मोहोळचा (Mohol) पैलवान सिकंदर शेख (sikandar shaikh) यांचा मोहळवासीयांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे. मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ग्रामदैवताचे दर्शन घेत शहारातून सिकंदर शेखची मिरवणूक काढण्यात आली. सिकंदरच्या नागरी सत्कारासाठी शेकडो मोहोळकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी ओपन जीपमधून (Open jeep rally) सिकंदरची रॅली काढण्यात आली. सिकंदर शेखने मोहोळ सह सोलापूरचे नाव देशभरामध्ये केले आहे. त्यामुळे लोकांच्यात एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळत होता.
केवळ महाराष्ट्र केसरीच नव्हे, तर देशभरातील विविध कुस्त्यांमध्ये सिकंदरची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सिकंदर शेख याने सुध्दा नागरी सत्कारानंतर ग्रामस्थांचे आभार मानले. “मोहोळमध्ये अनेक मल्लं तयार होत आहेत. पुढच्या काळात त्यांना देखील मार्गदर्शन करणार आहे. मागील पंधरा वर्षापासून मी पैलवानकीसाठी अपार कष्ट घेत आहे. त्यानंतर मला आज हे यश मिळालेलं आहे. मात्र असं असलं तरी मला अजून खूप काम करायचे आहे. एवढ्यावर थांबून चालणार नाही, असं मत सिकंदर शेखने व्यक्त केलं.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर सिंकदर शेख चर्चेत आला होता. त्याच्यावर अन्याय झाल्याचा अनेकांनी सूर ओढला होता. त्यानंतर त्याच्या गावात सत्कार करण्यात आला आहे.