देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही, कारण ते…; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole on Devendra Fadnavis and Lolsabha Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही, कारण ते...; नाना पटोलेंची घणाघाती टीका
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 3:58 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत, असं पटोले म्हणालेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले आज सोलापुरात आहेत. तिथे ते बोलत होते. शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही पोथी पुराणात वाचले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे मटण खाणारे ब्राह्मण आहेत. यांच्या शाप लागत नाही, हे त्यांना देखील माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्हीसोबत मटण खाललं आहे, असं नान पटोले म्हणाले.

भाजपवर निशाणा

पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या प्रश्नांना हात घातला नाही. किंबहुना मागील वेळी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही. धर्माच्या आधारावर सुरू असलेली मोदींचे भाषण ऐकायला लोकांना कंटाळले आहेत. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावे लागतात. तर राहुल गांधींचा सभेला लोक उन्हात उभा राहायला तयार आहे. या निवडणुका देशाच्या आहेत धर्माच्या नाहीत. आता सोलापुरात कोणतेही नेते आले तरी मोदीचे सरकार येणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांना महाराष्ट्रातील चित्र कळले आहे. बुथवर जेवढे मतदान झाले त्यावर दोन-तीन टक्के मतदान वाढवत आहेत. निवडणूक आयोगाने 70 C प्रमाणे आकडे असावेत. त्यांनी ती चूक करू नये अशी आमची भूमिका आहे, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे. इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.