“फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी”; भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली

| Updated on: Mar 12, 2023 | 5:38 PM

उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र ते फेसबुकवरचे मुख्यमंत्री होते अशी टीका आता भाजपकडून केली जात आहे.

फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी; भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली
Follow us on

करमाळा/सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हही एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेचे वाद आणखी वाढले आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्हीही असल्याने त्यावरून हा वाद आणखी टोकाला पोहचला आहे.

त्यावरून ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला जातो आहे. मात्र आता भाजपचे मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर त्याचवेळी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी काय काम केले, त्यावरूनही जोरदार टीका केली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फक्त फेसबुकवरच होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची करमाळ्यात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

बाळासाहेब विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते, मात्र ते फक्त फेसबुकवरचचे मुख्यमंत्री होते अशी खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून फेसबुकवर काय सांगायचे माझे कुटुंब तुमची जबाबदारी आणि हे घरात बसायचे.

तर यांची जबाबदारी आपण घ्यायची आणि लोक वाऱ्यावर सोडायची अशी खरमरती टीकाही त्यांनी यावेळी केली. करमाळा येथील स्वर्गीय माजी मंत्री दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.