“दुष्काळातही सन्मानानं कसं जगायचं याचा आदर्श ‘या’ लोकांनी दाखवला”; शरद पवार यांनी या लोकांबद्दल गौरवोद्गगार काढले…
शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करणाऱ्या शरद पवार यांचा आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मेडशिंगे येथे कार्यक्रमाासाठी आले असताना त्यांनी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची आढावा घेताना दुष्काळ वाईट असला तरी त्यातून संघर्ष निर्माण करण्याची ताकद कशी येते हे सुद्धा शरद पवार यांनी दुष्काळजन्य परिस्थितीच्या भागातील उदाहरणं देऊन सांगितले. याप्रसंगी शरद पवार यांनी सांगितले की, दुष्काळ असताना पण त्यावर मात करून सन्मानाने कसं जगायचे यांचा आदर्श काही भागातील लोकांनी दाखवला. त्यामध्ये संगोल्याचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिथं दुष्काळीजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून जगण्याची संभावना अधिक जास्त असते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांचे मोठेपण सांगताना ते म्हणाले की, देशभरात सोन्या चांदीचे काम करणारे लोकं ही दुष्काळी भागातील आहे.
विटा, तासगाव, सांगोला भागातील लोकं दिल्ली तसेच इतर ठिकाणी भेटत असतात. या भागातील लोकं देशात कुठेही सोने विकायचे काम करतात आणि राहतात पण घरात सून आपल्या भागातीलच आणतात असंही त्यांनी यावेळी सांगितले. संकट काळात चांगली कामं होत असतात.
त्यामध्ये दुष्काळी भागाचा समावेश असतो, त्यामुळे अशी कामं ही सांगोल्यातील लोकांनी केली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अलीकडच्या काळात जैविक शेती पुढे आली आहे, त्यामुळे जैविक शेतीमध्ये उत्पन्न कमी असले तरी ते पण चांगली शेती होती असंही त्यांनी शेतीविषयी बोलताना सांगितले.
जैविक उत्पादन करणारे शेतकरी अनेक दुकानं असल्याचे सांगत आज शहरी भागात पुणेकर यांना माहिती आहे मात्र उत्पादन पाहिजे असेल तर ते जैविक दुकानातून घेतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
संशोधन आणि निष्कर्ष अशा दोन गोष्टींची आज शेतीला गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जो उत्तम शेती करतो, त्याला अशा माती परीक्षण प्रयोगशाळेचा फायदा होणार असल्याचे सांगत त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेचं महत्वंही अधोरेखित केले.
शेतीविषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांकडे असलेले शेणखत हे उपयोगी पडणारे खत हे शेतीसाठी फायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी त्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो वापर करुन शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.