लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच…; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल

Praniti Shinde on BJP and Solapur Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच निवडणूक, संविधान अन् सोलापूरचा विकास यावर भाष्य. वाचा सविस्तर...

लोकांच्या भावना भाजपला कळल्या, त्यामुळेच...; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 5:05 PM

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात दौरा करत आहेत. प्रणिती शिंदे स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रचारात ध्रुवीकरणाचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे राहिले नाहीत. लोकांच्या भावना भाजपला कळल्या. त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

संविधानावर प्रणिती शिंदे म्हणाल्या…

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. या सर्वांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञता आहे. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थी विहारात होतेय. कारण ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे.संविधान, गोरगरीब, कामगार, गृहिणी धोक्यात आहे. आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे. त्यामुळे ही लढाई माझ्या एकटीची नाही. आपल्या सर्वांची सोलापूर वाचवण्याची लढाई आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मोदी सरकारवर निशाणा

मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे. ही निवडणूक नेत्यांनी नाही तर पूर्णपणे लोकांनी ताब्यात घेतली आहे. लोकांना आता भाजप नकोय. त्यांच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करतेय. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. महागाई आणि जीएसटी मुळे दोन वेळचे जेवण कसबस केलं जातंय. ही लढाई केवळ मतदानापुरती नाही. त्यामुळे लोकांचा विजय व्हावा हीच अपेक्षा आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सोलापुरात प्रचंड ऊन आहे. या उन्हात देखील लोकांनी मला साथ दिली, हीच लोकशाही आहे. आजची रात्र वैऱ्याची आहे. मतदानाला केवळ दोन दिवस राहिलेत. मतदानाचा उत्सव आपण साजरा करूयात, असं आवाहनही प्रणिती यांनी केलं.

लोकांच्या भावना भाजपला कळल्या त्यामुळेच त्यांनी मोदींपासून योगीपर्यंत प्रचारासाठी नेते आणले आहेत. लोक एकत्र आले की आता त्यांना कळेल. हुकूमशाही नाहीतर लोकशाहीची ताकद काय असते ते…, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.