जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही…; प्रणिती शिंदेंचा सोलापूरकरांना शब्द
Praniti Shinde on Congress and Loksabha Election 2024 : 400 तर सोडाच पण महायुतीला तर 'एवढ्या' जागा मिळणं पण कठीणंय; प्रणिती शिंदेंना विश्वास... सोलापुरात बोलताना काय म्हणाल्या? सोलापूरकरांना काय शब्द दिला? प्रणिती शिंदे यांचा भाजपवर घणाघात... वाचा सविस्तर...
सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करतायेत. ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीलां खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा. ते फक्त गाजर दाखवत आहेत. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या. मग बाकी ते टेन्शन माझं राहील. मी ईडीबिडीला घाबरत नाही. मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही. त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत.
भाजपवर घणाघात
मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला. भाजपने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला. मागच्या 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं. हा एकच प्रश्न त्यांना विचारा. त्यांची बोलती बंद होईल. ऐन इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला. म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय…?, असा संतप्त सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.
प्रणिती शिंदेंचे गंभीर आरोप
भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय. दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
भाजपकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हला एवढा आत्मविश्वास आहे. तर एवढी भिती का आहे तुम्हला..? 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत. कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे, असंही प्रणिती म्हणाल्या.
भाजपमुळे धार्मिक तेढ- प्रणिती शिंदे
भाजपवाले उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं.? हाथी के दात दिखाने के एक और खाणे के एक. यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय. तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म – जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत. आधी आपण असे नव्हतो, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.