मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण; राजेंद्र राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दुसरा पर्याय…

Rajendra Raut on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आजपासून त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यावर राजेंद्र राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही राजेंद्र राऊतांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषण; राजेंद्र राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दुसरा पर्याय...
मनोज जरांगे
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 9:03 AM

मराठा आरक्षणासाठी मी जो मुद्दा मांडला आहे तो बरोबर आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच मागणी घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत. सर्व मराठा नेत्यांना विनंती आहे विशेष अधिवेशन घेण्याशिवाय पर्याय नाही. मी 5 दिवसापासून बार्शीत आंदोलन करतोय मात्र 288 पैकी मराठा आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी संदर्भात अद्याप एक आमदार बोलला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे कोणीही धाडस करत नाही. मात्र त्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मी सुरुवात केली, असं बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणालेत.

राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया काय?

मनोज जरांगे पाटील यांचा जो मुद्दा आहे तोच माझाही आहे. सनदशीर मार्गाने चालू आहे. आरक्षण जर मिळवायचा असेल तर विधानसभेत अधिवेशन घ्यावे लागेल. अन्यथा विधिज्ञ उभा करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल. याशिवाय मराठा आरक्षणासंदर्भात दुसरा पर्याय नाही. हाच मुद्दा जरांगे पाटलांच्या लक्षात आला नसेल. जरांगे पाटील जर म्हणले असतील अधिवेशन घ्या तर आनंदाची बाब आहे. त्यामुळे जर त्यांची माझी भूमिका ही एक झाली तर आनंदाची बाब आहे, असं राजेंद्र राऊतांनी म्हटलं आहे.

विशेष अधिवेशनाबाबत काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सगळ्यानी योगदान दिले आहे. त्यांनी तिकडून द्यावे, मी इकडून देईल. मनोज जरांगे पाटील उपोषणाची लढाई लढतात तर मी ठिय्या आंदोलन करतो. सर्व आमदारांना विनंती करतो कारण त्यांनाही उद्या मराठा समाजाचे मतदान घ्यायचे आहे. आमदारांनी पत्र द्यावीत. सरकारवर दबाव वाढवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असं मत विशेष अधिवेशनाबाबत राजेंद्र राऊत यांनी मांडलं आहे.

विरोधी पक्ष सर्व गोष्टींवर आंदोलन करतात मात्र याबाबतीत भूमिका घेत नाही. विरोधी पक्षाने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं का नाही यासाठी अधिवेशनाची मागणी का करत नाही? त्यावेळेस कळेल मराठा आरक्षणाला सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे का विरोधकांचा आहे. चाळीस वर्षाचा प्रश्न आहे तो कुठेतरी निघाली काढा. लोकसभा निवडणूक झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका ही पाच वर्षानंतर येणार आहेत. उद्या जर मतदान केलं दुसरे निवडून आले ते तरी देणार आहेत का..?, असं राऊत म्हणाले.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.