उद्धवजी, आम्हाला 25 जागांवर उमेदवारी द्या; कुणी केली मागणी?

Sambhaji Brigade on Vidhansabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्याकडे एका संघटनेने उमेदवारी मागतली आहे. 25 जागांवर उमेदवारी देण्याबाबत या संघटनेने मागणी केली आहे. आता ही मागणी उद्धव ठाकरे मान्य करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. वाचा.....

उद्धवजी, आम्हाला 25 जागांवर उमेदवारी द्या; कुणी केली मागणी?
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 2:49 PM

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही नेत्यांच्या वारंवार या संदर्भात बैठका होत आहेत. तीन पक्षांच्या जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. कोणता विधानसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार? उमेदवार कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. असं असतानाच आता एका संघटनेने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेने ही मागणी केली आहे.

25 जागांवर लढण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी

सोलापूर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी याबाबत टीव्ही 9 मराठीला माहिती दिली. उद्वव ठाकरे यांच्याकडे 25 जागांची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जागेच्या मागणी प्रश्नी नुकतीच आमची पहिली बैठक देखील ठाकरे यांच्यासोबत पार पडली आहे. या बैठकीत आम्ही 25 मतदार संघाच्या नावाची यादी दिली आहे. जागा वाटपाच्या संदर्भात आणखी दोन बैठका होतील, असं गंगाधर बनबरे यांनी म्हटलं आहे. लोकसभेला आम्ही एकाही जागेची मागणी केली नव्हती. मात्र विधानसभेला राज्यातील 25 मतदार संघात आम्ही दोन वर्षांपासून काम करत आहोत. आमची देखील चाचपणी सुरु आहे. सोलापूर जिल्हातील तीन मतदार संघाचीदेखील आम्ही मागणी केली आहे, असंही ते म्हणाले.

मनोज जरांगेंना पाठिंबा

मागच्या वर्षभरापासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरही गंगाधन बनबरे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा सुरु असलेला लढा आणी मागणी योग्यच आहे. सरकारने गांभिर्याने घ्यायला हवं. मनोज जरांगे पाटील यांचा लोकसभेला फॅक्टर चालला आहे. विधानसभेला देखील फॅक्टर दिसेल यात शंका नाही, असं बनबरे म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा होतेय. विरोधी पक्ष या योजनेवर टीका करताना दिसतात. गंगाधन बनबरे यांनी या योजनेचा दाखला देत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी सरकारने कितीही महिलांसाठी योजना आणल्या तरी निवडणुकीवर याचा काही परिणाम होणार नाही. ताकदीने मविआचं सरकार येणार आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.