मी आमदारकीचा राजीनामा देऊ का? शरद पवारांसमोर जानकरांचा सवाल, मारकडवाडीत नेमकं काय घडतंय?

Uttam Jankar Speech at Markadwadi : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊ का?, असा सवाल माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्यासमोर मारकडवाडीकरांना विचारला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर बातमी......

मी आमदारकीचा राजीनामा देऊ का? शरद पवारांसमोर जानकरांचा सवाल, मारकडवाडीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार, उत्तम जानकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 11:12 AM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात आहेत. मारकडवाडीतील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मतदान होऊ शकलं नाही. याच मारकडवाडीतील लोकांशी बोलण्यासाठी शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शरद पवारांसमोर बोलत असताना मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊ का? असा सवाल माळशिरसकरांना केला.

मी राजीनामा देऊ का? जानकरांचा सवाल

मी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की, मारकडवाडीतील 1400 लोकांचे अफेडेव्हिट करणार आहेत. ज्यांनी मला मतदान दिले त्यांचे अफेडेव्हिट कोर्टात देणार आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले आहेत. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का?, असा सवाल आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

उत्तमराव जानकर काय म्हणाले?

माळशिरसच्या पश्चिम भागातून प्रत्येक फेरीला मी मागे पडलो. त्यावेळी आम्ही VV PAT मोजणीची मागणी केली मात्र मतमोजणी सुरु असताना तसे करता येत नाही असे सांगितले. या निकालानंतर लोक 3 दिवस माझ्याडे येत होते. कारण असं मतदान कसं काय झालं हा सवाल होता. त्यामुळे ग्रामस्थांनी ठरवले की आपण बॅलेट पेपरवर मतदान करावे. मात्र प्रशासनाने त्याला नकार दिला. मारकडवाडी गावातील माती मी चैत्यभूमीवर नेली आणि तेथे वाहिली. कारण मारकडवाडी येथील लोक लढाऊ बाण्याचे आहेत, असं उत्तमराव जानकर म्हणालेत.

राहुल गांधी यांनी माणसे पाठवून इथली माती घेऊन गेले. महात्मा गांधी यांच्या चरणावर मारकडवाडीतील माती वाहणार आहेत. मला काल अनेक आमदार म्हणत होते आता विजयी झालात ना, कशाला करता जाऊद्या की. पण लोकशाही टिकली पाहिजे, आमदारकी गेली तर गेली. लोकसभेला भाजपला केवळ 54 हजार मतं आहेत. मग आता 1 लाख हजार मतं कसं मिळाली? यांनी मोदीला माळशिरसच्या बाजारात उतरवले होते. गुरुवारी माळशिरसचा बाजार असतो त्या ठिकाणी मोदींची सभा घेतली तरीही 54 हजार मतं मिळाली. मी राजीनामा देतो. माझी पोटनिवडणूक घ्यावी पण बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी माझी विनंती, असं जानकर म्हणालेत.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.