‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी रांगेत उभ्या असेलल्या महिलांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्याकडून मोठ्या प्रमाणात…

Women Line For Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. ठिकठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी महिलांनी रांग लावली आहे. या महिलांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीने जाणून घेतली. तेव्हा त्या काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

'लाडकी बहीण योजने'चा लाभ घेण्यासाठी रांगेत उभ्या असेलल्या महिलांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्याकडून मोठ्या प्रमाणात...
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 4:15 PM

28 जून रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठीच्या विशेष योजनेची घोषणा केली आहे. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. ‘लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी महा ई- सेवा केंद्राबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांची महा ई- सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे. अर्ज भरण्यासाठी 15 दिवस मुदत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत असलेल्या महिलांनी गंभीर आरोप केला आहे.

महिलांचा आरोप काय?

अर्ज भरण्यासाठी आम्ही सकाळपासून रांगेत आहोत. त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. पैशाची अतिरिक्त मागणी होत नसली तरी रांगेत थांबावं लागत आहे. बॉण्डसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात आहेत. मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला खूप वेळ रांगेत थांबावं लागत आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हायला हवी अशी आमची मागणी आहे, असं ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी म्हटलं आहे.

सेतू कार्यालय व्यवस्थापक काय म्हणाले?

लाडली बहीण योजनेसाठी महिलांनी सोलापुरातील महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. सेतू कार्यालयाचे व्यवस्थापक अमोल सुरवसे यांनी या योजनेवर आणि मिळणाऱ्या महिलांच्या प्रतिसादावर भाष्य केलं आहे. नेहमी 300 ते 400 अर्ज येत होते. मात्र योजना जाहीर झाल्यापासून दीड ते दोन हजार अर्ज येत आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर मोठ्याप्रमाणात ताण आलेला आहे, असं ते म्हणाले.

आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत सेतू कार्यालय सुरू ठेवलं आहे. त्याचबरोबर सेतू कार्यालयात अर्जासाठी शासनाने आखून दिलेले शुल्क घेतले जातात. त्याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाहीत. एजंटकडे कोणीही न जाता थेट सेतू केंद्रातील खिडकीवर अर्ज दाखल करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, असंहा अमोल सुरवसे यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.