जिसकी लाठी उसकी भैस, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे असं का म्हणाल्यात
आमच्या तिघांच्या पक्षाच्या ताट्यांत बघायची, भाजप व शिंदे गटाने गरज नाही. त्यांनी आपआपले बघावे.
सोलापूर : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे बऱ्यात दिवसांनंतर माध्यमांशी बोलल्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील जनता सोडून मुख्यमंत्री कुठेही जाऊ शकतात. शेतकरी, गोरगरिबांचे प्रश्न न वाऱ्यावर सोडून ते गुवाहाटीला, सुरतला आमदाराबरोबर जाऊ शकतात. विजय शिवतारे यांनी उठावाचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात मी पेरल्याचं म्हंटलं. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंच्या वक्तव्याचा विचार करायला हवा.विजय शिवतारेसारख्या आल्या गेल्या टपली मारत असतील, तर एकनाथरावांविषयी असं बोलणं फार वाईट आहे. एकनाथ शिंदेंच्या कर्तुत्वाचा विचार करुन नेत्यांनी बोलायला हवे. सन्मान राखायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
आनंद परांजपे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. जिसकी लाठी उसकी भैस होती हैं. त्याप्रमाणे सत्ता हाती असल्याने हे असं सुरु आहे. ठाकरे सेनेच्या ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांची बोटं छाटण्याची भाषा करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. शाई अंगावर टाकणाऱ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला. देवेंद्र भाऊ हो तो कुछ नामुमकीन नहीं..!, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी सेना या जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, महाविकास आघाडीमधील आम्ही भाग आहोत. आमच्या तिघांच्या पक्षाच्या ताट्यांत बघायची, भाजप व शिंदे गटाने गरज नाही. त्यांनी आपआपले बघावे.
चंद्रकांत पाटील-फडणवीस यांनी पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. तर दुसरीकडे राम कदम यांना फडणवीस यांनी शाई फेकण्याचे कृत्य करणाऱ्यांना मारु असं वक्तव्य करायला लावले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांविषयी जनमाणसात उद्रेक निर्माण करण्याचे काम फडणवीस यांनी सुरु केले आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
पंकज मुंडे साईडला गेल्यात. तीच परिस्थिती विनोद तावडे यांची झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांना नाईलाजाने वक्तव्य करावी लागताहेत. राजकारणातून यांना उठवण्याचे काम फडणवीस यांच्याकडून केले जात आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.