स्फोटाचे गूढ, काळ्या विमानातून हवेत झाला मोठा स्फोट, सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी हादरले

माढा, वैराग आणि बार्शी या तिन्ही ठिकाणी सगळे गावकरी या आवाजाने हादरले. नेमका हा स्फोट कशाला झाला, याचे गूढ मात्र कायम आहे. आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की एखादा बॉम्ब पडल्याची भीती नागरिकांना वाटली. हे विमान नेमके कोणत्या संस्थेचे होते की परदेशातून हे विमान आले होते, अशी चर्चांना आता वेग आला आहे. 

स्फोटाचे गूढ, काळ्या विमानातून हवेत झाला मोठा स्फोट, सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी हादरले
स्फोटाचे गूढImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:21 PM

सोलापूर – बारामतीत प्रशिक्षण घेत असलेल्या वैमानिकाचे विमान कोसळल्याची घटना घडलेली असतानाच, दुसऱ्या एका घटनेनं आज सोलापूर (Solapur)जिल्हा हादरला आहे. माढा (Madha)तालुक्यातील वडशिंगे गावाच्या शिवारा दुपारी साडे बाराच्या सुमारास मोठा स्फोटाचा आवाज झाला. आकाशातून चाललेल्या एका काळ्या रंगाच्या विमानातून हा स्फोट (Blast from plane) घडवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शईंनी सांगितले आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की उभ्या पंचक्रोशीत हा आवाज ऐकू गेला. माढा, वैराग आणि बार्शी या तिन्ही ठिकाणी सगळे गावकरी या आवाजाने हादरले. नेमका हा स्फोट कशाला झाला, याचे गूढ मात्र कायम आहे. आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की एखादा बॉम्ब पडल्याची भीती नागरिकांना वाटली. हे विमान नेमके कोणत्या संस्थेचे होते की परदेशातून हे विमान आले होते, अशी चर्चांना आता वेग आला आहे.

नेमकं काय घडलं?

वडशिंगे गावाच्या शिवारात अनिल साठे यांच्या शेतात सुभाष सौदागर शिंदे, परमेश्वर शाहू सावंत,दत्तु मारुती शिंदे, भगवान दत्तु शिंदे हे ऊस लागवड करण्याचे काम करीत होते. काम करत असताना थोडं थांबून झाडाखाली पाणी पित असताना त्यांना विमानाचा आवाज ऐकू आला. चौघाही शेतकऱ्यांनी पाहिले असता, विमानातुन हवेत मोठा स्फोट झाल्याचे त्यांना समोरच दिसले. डोळ्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे हे शेतकरी चांगलेच घाबरले, त्याची भंबेरी उडाली होती. आवाजाची तीव्रता एवढी मोठी होती ती गावातील, बाजारपेठेतील नागरिकही या आवाजाने धास्तावले.

हे सुद्धा वाचा

आभाळ फाटल्यासारखा झाला आवाज

हा आवाज ऐकल्यानंतर शेतात काम करत असलेले शेतकरी घाबरुन गावाकडे धावत सुटले. तर दुसऱ्या शेतांमध्ये असलेले मजूर हे उसतोडणी सोडून दुसऱ्यांच्या शेतात आसरा घ्यायला गेले. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला होता, अशी माहिती या शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी दिली आहे. दरम्यान बारामतीवरुन आलेले शिकाऊ विमान इंदापुरात पडल्याची घटना माहिती असून, माढ्यात घडलेली ही घटना वेगळी आहे. असं प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले आहे. नेमंका स्फोट कशाचा झाला, आणि विमान कुठले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाईल अशी माहितीही माढाच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली आहे. हे विमान कुठले होते आणि त्याने स्फोट कशाचा केला, याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. परिसरातील नागरिकही चांगलेच धास्तावले आहेत. प्रशाससाने याची सविस्तर माहिती घेणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.