सोलापूरः लाकडी निबोंडी योजनेतून (Lakdi Nombodi Skim) बारामती-इंदापूर दोन टीएमसी उजनीतून पाणी (Ujani Water) देण्याच्या निर्णयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharane) यांना पालकमंत्री पदावरू हटवण्यासाठी राजकारण सुरू झाले असल्याचा आरोप पंढरपूर येथील धनगर समाजाकडून करण्यात आला आहे. याला विरोध करत जर का दत्तात्रय भरणे यांना सोलापूर पालकमंत्री पदावरून जर हटवले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी वारीला महापूजेला पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही असा पवित्रा धनगर समाज संघटनेकडून घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटलेले दिसून येत आहे. आज पंढरपूरमध्ये धनगर समाजाची बैठक झाली.
या बैठकीत जर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवण्याचा निर्णय राज्य सरकार करत असतील तर आमचा विरोध असेल. तसेच संपूर्ण धनगर समाज बारामती जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वीच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून आषाढी वारीच्या पूजेचा मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र आता उजणीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आणि दत्तात्रय भरणे यांच्यावर राजकारण केले जात असल्याने पंढरपूरातील धनगर समाज आक्रमक झाला आहे.
त्यामुळे आता लाकडी निबोंडी योजनेतून बारामती-इंदापूर दोन टीएमसी उजनीतून पाणी देण्याच्या निर्णयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र उजणीच्या पाण्यामुळे राजकारण तापले असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे.
काही दिवसापूर्वीच दत्तात्रय भरणे सोलापूर दौऱ्यावर आले असतानाच त्यांनी नागरिकांना आणि माध्यमांना जाहीर आवाहन केले होते, की, उजणीच्या पाण्याबद्दल कुणीही गैरसमज करुन घेऊ नये असे आवाहन करुन त्यांनी उजणीच्या पाण्यावर होत असलेल्या राजकारणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांच्यावर राजकारण सुरु असल्याचे बोलले जात असल्याने येणाऱ्या काळात उजणीच्या पाण्याचा प्रश्न पेटणार की पाणी योजना सुरळीत सुरु राहणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.