विश्वासघात कुणी केला?, नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारावं, राधाकृष्ण विखेपाटील यांची टीका

भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही.

विश्वासघात कुणी केला?, नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारावं, राधाकृष्ण विखेपाटील यांची टीका
राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 6:14 PM

सोलापूर : मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा, असं ते म्हणाले. सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केला अशी टीका नाना पटोले यांनी केली. या पटोले यांच्या वक्तव्याचा विखेपाटील यांनी समाचार घेतला. विश्वासघात कोणी केला, हा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी आधी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना विचारावा. विश्वासघात कोणी केला, हे बाळासाहेब थोरतांना विचारलं पाहिजे. विश्वासघात झाला की नाही. हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उभे राहण्याच्या या निर्णयाला समर्थन आहे का? यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की, विश्वासघात केला की नाही, असं विखेपाटील यांनी स्पष्ट केलं.

आमचा विरोध असण्याचे कारण नाही

राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला विचारले हे मला माहिती नाही. भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही.

राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितलं की, काँग्रेसमध्ये कोणते गट आहेत हे माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय सुरू आहे मला कल्पना नाही. या सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झालेली आहे.

म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा

काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्यजित तांबे यांची अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं, असंही विखेपाटील यांनी म्हंटलं.

सत्यजित तांबे भाजपामध्ये आल्याने भाजपाची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे नाही. कारण भाजप आधीच तिथे ताकतवान आहे. मात्र सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होईल. चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो.

चंद्रकांत खैरे यांनी बेताल वक्तव्य बंद करावे

विखेपाटील म्हणाले, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची किव करावीसी वाटते. चंद्रकांत खैरे यांनी असे बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. पंकजा मुंडे या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि करत राहणार, असंही विखेपाटील यांनी स्पष्ट केलं.

लोकांसाठी काम करता येत नसेल, तर सन्मानानं एक्झीट केलेली बरी, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी त्यांना ठाकरे गटात येण्याची ऑफरच दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.