छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली कुणी? रोहित टिळकांची त्या प्रतिक्रियेने उंचावल्या भुवया, महात्मा फुलेंबाबत म्हणाले काय?
Rohit Tilak Reaction : छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून मुद्दामहून वाद उकरून काढण्यात येत आहे. शिवरायांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचा दावा सांगण्यात येतो. तर दुसरीकडे लोकमान्य टिळकांचे वंशज आणि काँग्रेस नेते रोहित टिळकांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. सर्वांच्या तोंडी महात्मा फुले यांचे आपसूक नाव येते. महात्मा फुले यांनी महाराजांवर पोवडा सुद्धा लिहिला. तर शिवरायांची समाधी कोणी शोधली यावर रोहित टिळकांची प्रतिक्रिया दिली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर रोहित टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भागवत यांनी लोकमान्य टिळकांनी शिवरायांची समाधी शोधल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले रोहित टिळक?
डगलस नामक ब्रिटिश अधिकार्याने पहिल्यांदा सांगितले की रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी बराच कचरा साचला आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा फुले हे गडावर गेले. सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी अशी प्रतिक्रिया दिली. सोलापूर येथे श्री भगवान परशुराम क्रिकेट प्रिमिअर लीग 2025 या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.




रायगड हा इंग्रजांच्या ताब्यात
प्रत्येक वेळी इतिहासाच्या संदर्भातून आपण निष्कर्ष काढत असतो, असे टिळक म्हणाले. त्या काळात रायगड हा ब्रिटिश मिलिटरीच्या ताब्यात होता. तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नव्हती. त्यावेळी डगलस नामक ब्रिटिश अधिकारी रायगडावर गेला होता, त्याने सांगितले की शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी बराच कचरा साचला आहे. बॉम्बे बुक या पुस्तकात त्याने याबाबत लिहिले आहे. त्याने त्याकाळी लोकांना आवाहन केले होते की, तिथे समाधी अशा स्थितीत आहे.
त्यानंतर त्या समाधी स्थळी साफसफाई सुरू झाली होती. लोकमान्य टिळक यांनी परवानगी घेऊन तिथे गेले, महात्मा फुलेदेखील तेथे गेले होते. त्यामुळे इतिहासाला धरून यावर बोलले जाते. त्यामुळे यात कोणी केले आणि कोणी नाही हे पाहण्यापेक्षा त्यांचे कार्य मोठे आहे. इतिहासात काही संदर्भानुसार आपण बोलतो, काही वर्तमान पत्र, पुस्तकं यावरून बोलतो, असे रोहित टिळक म्हणाले.
शिवजयंतीविषयी काय दावा?
डगलस हा अधिकारी रायगडावर गेल्यानंतर राज्यात मोठ्या चळवळी सुरू झाल्या. लोकमान्य टिळकांनी त्याबाबत पुण्यात मोठी सभादेखील घेतली होती. त्यात त्यांनी सांगितले की शिवरायांची जयंती साजरी व्हायला हवी, सर्वानी तिथे गेले पाहिजे, असा दावा रोहित टिळक यांनी केला. मुळात हे सर्व इतिहासाच्या रेफरन्सवर बोलले जाते त्यामुळे आपण ठोसपणे ते सांगू शकत नाही. म्हणून त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही असे काँग्रेस नेते आणि लोकमान्य टिळकांचे वारसदार रोहित टिळक म्हणाले.