Video | महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय.

Video | महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:01 PM

मुंबईः महाविकास आघाडीचे शिलेदार आणि शिवसेनेची (Shiv Sena) मुलखमैदानी तोफ म्हणून सध्या चर्चेत असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आता त्यांच्या भाषेत भाजपचे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उत्तर देत त्यांनी केलेल्या आरोपांमधली हवा काढून टाकलीय. शिवाय, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केलाय. राऊत्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचं डोकं गरगरलंय, हे सांगायलाही सोमय्या विसरले नाहीत. संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप केला. तर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये असल्याचा दावाही राऊत यांनी केला. या आरोपाला आज सोमय्यांनी उत्तर दिले.

सोमय्या काय म्हणाले?

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केलाय.

‘आरटीआय’मधून समोर

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केलं. जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हा ग्रामपंचायतीचा अधिकारय. जो ‘आरटीआय’मधून समोर आला. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे. आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून घरं करत आहेत.

इतर बातम्या :

‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’, मोहित कंबोज यांचा खोचक सवाल; आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर

Video : शिवसेना भवनसमोरचा एक व्हिडीओ जो भाजपच्या नेत्यांनीही का पाहावा? मराठी-गुजराती ध्रुवीकरण?

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....