Video | रश्मी ठाकरेंच्याविरोधात सोमय्यांना दारुगोळा कुणी पुरवला? कोण आहेत मेधाजी? सोमय्यांकडूनच ऐका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, करा आमची चौकशी, पण नाटकं करू नका. राऊत तुम्ही काल जे सांगितलं, तसंच पाच वर्षांपूर्वी मेधाच्या नावे म्हणाला होता.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधात उघडलेल्या आघाडीला आज किरीट सोमय्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सोबतच रश्मी ठाकरेंच्याविरोधात सोमय्यांना दारुगोळा कुणी पुरवला, कोण आहेत मेधाजी, याचीही पत्रकार परिषदेमध्ये फोड करून सांगितली. आता यावरून येणाऱ्या काळात मुंबईच्या राजकारणात बऱ्याच वेगवान हालचाली होण्याची शक्यताय. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेना (Shiv Sena) भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर (Bjp) जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप केला. तर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये असल्याचा दावाही राऊत यांनी केला. या आरोपाला आज सोमय्यांनी उत्तर दिले.
दारुगोळा कोणी दिला?
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, प्रताप सरनाईक हे मी ‘आरटीआय’ करताना माझ्या बाजुला येऊन बसले. त्याचे सगळे फोटो त्यांनीच काढले. ते व्हायरल केले. मात्र, माझ्यावर कारवाईचा इशारा दिला गेला. माहिती अधिकाराअंतर्गत मी मंत्रालयात गेलो, तर तुम्ही नाटक केलं. 2017 मध्ये हेच सगळं तुम्ही मेधा सोमय्यांच्या नावानं सांगितलं होतं. आता पाच वर्ष झाली, तेव्हा तुम्ही का सांगितलं नाही, असा सवाल त्यांनी केला. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या यांच्या सामाजिक कामाची चौकशी करू असं म्हणालात, मग चौकशी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.
काय दिले आव्हान?
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, करा आमची चौकशी, पण नाटकं करू नका. राऊत तुम्ही काल जे सांगितलं, तसंच पाच वर्षांपूर्वी मेधाच्या नावे म्हणाला होता. आम्ही खोटं केलेलं नाही, पण ठाकरेंकडे जर त्यासंबंधी अधिक माहिती राऊतांनी दिली असेल, तर खुशाल चौकशी करा. कोविड घोटाळ्याची चौकशी का करत नाही आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अपील पण करणार नाही…
सोमय्या पुढे म्हणाले की, कालपण मी ट्वीट केलं, पण तुम्ही कुणी दाखवलं नाही. एक मिनिट एक मिनिट. आम्ही दमडीची कुठं काही चूक केलेली नाही. नंबर वन. याच बाबत 2017 मध्ये मेधाच्या नावे छापून आलं. विधानसभेत गेलं वर्षभर. 20 वर्षांपूर्वी शौचालय बांधलं, त्याची नाटकं केली. यांच्याकडे कागद असेल, तर आमची चौकशी करावीच. आम्ही अपील पण नाही करणार, असेही ते म्हणाले.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!