ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू
मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. साई गुणीसा इमारतीचं नाव आहे. काही लोक आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यामध्ये चौघे जण जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रँट रोडच्या नाना चौक परिसरातील रुबूनिसा मंजिल ही इमारत बरीच जुनी आहे. महापालिकेकडून या इमारतीला ६ महीने आधीच धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आले होते. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात ठिकाणी पाणी साचलं आहे. याच पावसाचा फटका सामान्य मुंबईकरांनाही बसला आहे. थोड्या वेळापूर्वी रुबूनिसा मंजिल इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामध्ये चौघे जण अडकल्याची माहिती समोर आली होती. महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये चौघे जखमी झाले होते, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर इमारतीमध्ये ३५ ते ४० लोक अडकले होते. त्या सर्वांना सुखरूपरित्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे.
Maharashtra | Part of the balcony of a building named Rubina Manzil collapsed in the Grand Road area of Mumbai. Some people are feared to be injured in this accident. Fire brigade personnel reached the spot: BMC
— ANI (@ANI) July 20, 2024