सगळ्यांनाच ईडीच्या नोटीस नाही… भाजपला बाहेरून पाठिंबा द्या, शरद पवार यांना कुणी केले असे आवाहन?

बाळासाहेबांचे व्हिजन विकासाचे होते. बाळासाहेब 80% समाजकारण आणि 20% टक्के राजकारण करायचे, पण हे तर 80% राजकारण आणि 20% सुद्धा विकास करत नाही अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

सगळ्यांनाच ईडीच्या नोटीस नाही... भाजपला बाहेरून पाठिंबा द्या, शरद पवार यांना कुणी केले असे आवाहन?
AJIT PAWAR AND SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 6:06 PM

ठाणे : 26 ऑगस्ट 2024 | राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही. आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे ते तिकडे गेले आहेत. जे गेले त्यांना ईडी कारवाईची भीती वाटत होती. त्यामुळे ते तिकडे गेले अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि आताचे विद्यमान मंत्री (शिंदे गट) दीपक केसरकर यांनी शरद पवार यांना सल्ला दिला आहे. तसेच, शरद पवार यांचे ईडीचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत. ‘राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना ईडीच्या नोटीस आलेल्या नाहीत. काही कारणे दाखवायची म्हणून दाखवू नका’, असे केसरकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानला जाऊन आले आहेत. उपमुख्यमंत्री जपानला गेले आणि राज्यासाठी बरेच पैसे घेऊन आले. हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा लवकरच जर्मनीला जाणार आहेत. तिथेही ते काही एमओयु (MOU) साइन करणार आहेत. जर्मनीमधूनही काही कोटींची गुंतवणूक राज्यात येईल असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आमच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत. त्यामुळेच आमच्याकडे माजी आमदार, माजी नगरसेवक यांचे इन्कमिंग सुरू झालं आहे. आम्ही, फडणवीस आणि अजित दादा मिळून शिल्लक सेनेला मोठा दणका देणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शरद पवार किती वेळा तेच तेच बोलत राहणार? त्यांचे इतके आमदार फुटले, इतके ज्येष्ठ नेते फुटले त्या सगळ्यांना काय ईडीच्या नोटीस आल्या नव्हत्या. शेवटी काही कारण दाखवायचं म्हणून काहीही कारण शरद पवार दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारताला एका उंचीवर घेऊन जात आहेत.’

‘पंतप्रधान मोदी यांच्या विकासाची कामे पाहून शरद पवार यांचे आमदार अजितदादा सोबत जात असतील तर त्याला शरद पवार यांचादेखील पाठिंबा असायला हवा. शरद पवार यांना जर भाजपसोबत जायचे नसेल तर नका जाऊ. पण ते भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. हवे असल्यास त्यांची संपूर्ण टीम भाजपसोबत पाठवू शकतात,’ असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

अनेक राजकीय नेत्यांना फोन टॅपिंग प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. तत्कालीन सरकारने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना त्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. ते CBI क्लोजर रिपोर्टवरुन स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला. ज्यांना यात अडकवण्याचे काम केले त्यांना हे चोख उत्तर आहे, असेही केसरकर म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.