मुलगा असावा तर असा ! वाजत गाजत लावलं 80 वर्षांच्या पित्याचं लग्न, सर्वत्र होत्ये चर्चा !

अमरावतीमध्ये एक अनोखं लग्न झालंय. तिथे एका 80 वर्षाच्या वृद्धाचं पुन्हा लग्न झालं, 65 वर्षांच्या महिलेशी त्याने विवाह केला. आणि विशेष बाब म्हणजे त्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर तो होता त्या वृद्ध इसमाचा मुलगा आणि नातेवाईक. त्या वृद्धाच्या मुला-मुलींनी, नातवंडांनी त्या दोघांचं मंडपात धडाक्यात लग्न लावून दिलं.

मुलगा असावा तर असा ! वाजत गाजत लावलं 80 वर्षांच्या पित्याचं लग्न,  सर्वत्र होत्ये चर्चा !
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 11:39 AM

अमरावतीमध्ये एक अनोखं लग्न झालंय. तिथे एका 80 वर्षाच्या वृद्धाचं पुन्हा लग्न झालं, 65 वर्षांच्या महिलेशी त्याने विवाह केला. आणि विशेष बाब म्हणजे त्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर तो होता त्या वृद्ध इसमाचा मुलगा आणि नातेवाईक. त्या वृद्धाच्या मुला-मुलींनी, नातवंडांनी त्या दोघांचं मंडपात धडाक्यात लग्न लावून दिलं. वयाच्या या टप्प्यावर लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात करणाऱ्या या वर-वधूंची आणि त्यांच्या अनोख्या लग्नाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

खरंतर या वृद्ध इसमाच्या पत्नीचे काही काळापूर्वी निधन झाले. जोडीदार निघून गेल्यामुळे त्याला खूप एकटं वाटत होतं. पित्याचं दु:ख मुलांना पहावलं नाही, आणि त्यांनी त्यांच्यासाठी साजेशी वधू शोधून धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील ही घटना आहे. 80 वर्षांचा वर आणि 65 वर्षांच्या वधूच्या लग्नात त्या वराचा 50 वर्षआंचा मुलगा आनंदाने सामील झाला. वडिलांच्या लग्नात मुलगा, मुलगी आणि कुटुंबातील सदस्यांनी, एवढंच नव्हे तर नातवंडांनीही ठेका धरत मस्त डान्सही केला.

काय आहे प्रकरण ?

खरंतर, अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील 80 वर्षीय विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. विठ्ठल खंदारे यांना चार मुलं, सुना, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पण जोडीदारचा मृत्यू झाल्यामुळे 80 व्या वर्षी विठ्ठल यांना खूपच एकटेपणा जाणवत होता. आपल्याला लग्न करायची इच्छा आहे, असे विठ्ठल यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. वडिलांची ही इच्छा ऐकून मुलं पहिल्यांदा हादरलीच. आपल्या वडिलांचा दुसरा विवाह करण्यास आणि आईच्या जागी दुसऱ्या कोणाला आणण्यास मुलांनी पहिले तर कडाडून विरोध केला.

मात्र, विठ्ठलराव खंदारे यांचा लग्नाचा आग्रह पाहून अखेर त्यांच्या मुलांनीही होकार दिला आणि ते वडिलांच्या लग्नासाठी तयार झाले. यानंतर त्यांनी वडिलांसाठी वधूचा शोध सुरू केला. त्यांच्यासाठी वधू शोधणं सोपं नव्हतं. त्यामुळेच वराचा एक प्रॉपर बायोडेटा तयार करण्यात आला.

बऱ्याच शोधानंतर अखेर  सापडली वधू 

वडिलांच्या वयाचा विचार करता त्यांच्यासाठी वधू मिळणे अवघड होते. मात्र, तरीही मुलांनी वडिलांसाठी वधूचा शोध सुरू केला. अखेर विठ्ठल खंडारे यांच्या मुलांनी अकोट, अकोल्यातील ६५ वर्षांच्या महिलेची लग्नाची बोलणी केली आणि अखेर त्यांचं लग्न ठरलं. यानंतर 8 मे रोजी चिंचोली रहिमापूर गावात विठ्ठल खंडारे यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विठ्ठल खंडारे यांच्या मुलाने गावातून वडिलांची वरात वाजतगाजत नेली. या अनोख्या लग्नाच्या वरातीत वर आणि त्याची मुलंही गाण्यावर ठेका धरत एकत्र नाचताना दिसली. हे पाहून नातवंडेही नाचू लागली. या विवाह सोहळ्यात चिंचोली रहिमापूरचे ग्रामस्थही सहभागी झाले होते. या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.