Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा राजकीय भूकंप, धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे शरद पवार गटात जाणार, सूत्रांची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. माढ्यात मोठी राजकीय उलटफेर होणार आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रामराजे निंबाळकर यांच्यासह भाजप नेते धैर्यशील मोहित पाटील हे देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुन्हा राजकीय भूकंप, धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे शरद पवार गटात जाणार, सूत्रांची माहिती
धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 8:00 PM

माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामाराजे निंबाळकर यांचा विरोध होता. दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. पण तरीही भाजप पक्षासाठी जे अनपेक्षित होतं तेच आता घडण्याची शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करणं भाजपला आता शक्य होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छादेखील व्यक्त केली होती. पण पक्षाने विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. विशेष म्हणजे त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वत: मंत्री गिरीश महाजन अकलूजला गेले. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण गिरीश महाजन यांच्यासमोर मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं.

माढ्यात मोठा राजकीय भूकंप होणार

दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज होते. यामुळे रामराजे आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटून नाराजीदेखील व्यक्त केली. पण तरीही उमेदवार बदलण्याचा निर्णय न झाल्याने आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार गट या जागेतून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी याबाबत खासगीत बोलताना माहिती दिली आहे. माढ्यात कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर कुटुंब एकत्रित निर्णय घेऊन कळवणार आहेत. पण संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.