Monsoon Update: महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण, 5 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता

Monsoon Update : मागच्या अनेक दिवसांपासून यावर्षी अधिक पाऊस पडेल असं भाकीत हवामान खात्याने वर्तविलं आहे. तसेच चांगला पाऊस होईल असंही सांगितलं आहे. यावर्षी मान्सून पाऊस वेळे आगोदर केरळमध्ये दाखल झाला आहे.

Monsoon Update: महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण, 5 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 7:26 AM

मुंबई – उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मान्सून (Monsoon) केरळात (Kerala) दाखल झाला असून दोन दिवसात तो इतर राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. देशात अनेक राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. येत्या चोवीस तासात काही राज्ये मान्सून व्यापेल अशी शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, दक्षित मध्य महाराष्ट्र , मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 5 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आज अनेक राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे

मागच्या अनेक दिवसांपासून यावर्षी अधिक पाऊस पडेल असं भाकीत हवामान खात्याने वर्तविलं आहे. तसेच चांगला पाऊस होईल असंही सांगितलं आहे. यावर्षी मान्सून पाऊस वेळे आगोदर केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच तो आज अनेक राज्यात सक्रीय होण्याची शक्यता आहे. मान्सून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्यास देशात सक्रीय व्हायला अधिक वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काही दिवसांपासून पुर्णपणे ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस देखील झाला आहे.

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की नैऋत्य मोसमी पाऊस ठरलेल्या वेळेपेक्षा तीन दिवस आधी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता.

मान्सूननंतर केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.