TOP 9 | विशेष बातम्या : अवकाळी पावसानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बेहाल, वाचा टॉप 9 घडामोडी
Maharashtra News : राज्यात आज ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारांचीही मारा पाहायल मिळाला. याचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाही बसला. जाणून घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या शहरांत नेमकं काय काय घडलं? TOP 9 घडामोडींमधून..
- थोडक्यात बचावले – एकविरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परत जात असताना एका भाविकाच्या चार चाकी गाडीला अपघात झालाय. सुदैवाने अपघात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
- सलग तिसऱ्या दिवशा अवकाळी – सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली.. कागणेरी गावात वाऱ्यामुळे बेदाणा शेडचे पत्रे उडून मोठं नुकसान झालंय. तर पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे.
- गारांचा पाऊस- सांगलीच्या मिरजमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीये. तर मिरजच्या पूर्व भागात गारांचा पाऊस पडलाय.
- द्राक्ष बाग भुईसपाट- सांगलीच्या जतमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे दीड एकरावरील द्राक्ष बाग भुईसपाट झाल्यात. त्यामुळे 24 लाखाचे नुकसान झालंय.
- आंबा बागायतदार धास्तावले- रत्नागिरीच्या लांजा आणि राजापूरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीये. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. तर आंबा बागायतदार मात्र या पावसानं धास्तावलेत.
- बनावट हापूस- कर्नाटकचा हापूस आंबा हा कोकणचा हापूस म्हणून विकण्यात आलाय. यासंदर्भात 2 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिलीये.. याशिवाय बनावट हापूस विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
- ‘जरंडेश्वर’चा ताबा शेतकऱ्यांना- जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी, सदस्य संचालक ईडी अधिकाऱ्यांची मुंबईत भेट घेणार आहेत. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्याही उपस्थित राहणार आहेत. तर जरंडेश्वर कारखान्याचा ताबा शेतकऱ्यांना देणार, असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलंय.
- जयंत पाटलांची चौकशी करा- राज्यात जातीय दंगल होऊ शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. असं वक्तव्य करणाऱ्या जयंत पाटलांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. तसेच राज्याचे पोलीस जयंत पाटलांची चौकशी करणार नसतील, तर केंद्रीप पोलीस त्यांची चौकशी करतील, असंही त्यांनी म्हटलं.
- श्रीलंकेत परिस्थिती खराब- गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून श्रीलंकेत परिस्थिती खराब असून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचं श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू जयसूर्या यांनी म्हटलंय.. जीवनावश्यक वस्तूंची खूप कमकरता आहे त्यामुळे नागरिक संप्तत होत आहेत, असंही जयसूर्या यांनी म्हटलंय.
Non Stop LIVE Update