नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, एका डब्ब्यात 54 प्रवासी

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विशेष 16 डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले (Special trains for labour from Nashik).

नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना,  एका डब्ब्यात 54 प्रवासी
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 4:05 PM

नाशिक : मध्य प्रदेशनंतर आज (2 मे) उत्तर प्रदेशच्या 845 नागरिकांना विशेष रेल्वेने लखनौला पाठवण्यात आलं. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विशेष 16 डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले (Special trains for labour from Nashik). यावेळी नाशिककरांच्यावतीनं परराज्यातल्या या नागरिकांना टाळ्या वाजवून आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करत निरोप देण्यात आला.

कोरोनाच्या संकटात नाशिकमध्ये एक दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. अनेक मजूर आपल्या मुलाबाळांसह सर्व संसार पाठीवर घेऊन पायीच मुंबईहून नाशिकमार्गे आपआपल्या राज्यात निघाले होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून शेल्टर कॅम्पमध्ये ठेवलं होतं. या शेल्टर कॅम्पमध्ये या मजुरांची रितसर आरोग्य तपासणी, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था हे सगळं करण्यात आलं होतं. अखेर जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली.

शुक्रवारी (1 मे) रात्री शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या तब्बल 345 लोकांना 6 डब्ब्यांच्या विशेष ट्रेनने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आलं. आज (1 मे) सकाळच्या सुमारास 845 उत्तर प्रदेशच्या रहिवाशांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. 16 डब्ब्यांच्या या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्ब्यात 54 लोकं अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला रवाना केलं.

दरम्यान नाशिककरांनी टाळ्यांच्या गजरात आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करत या मजुरांना निरोप दिला. राज्यात पहिल्यांदाच परराज्यातील लोकांना पाठवण्याची व्यवस्था नाशिक प्रशासनाच्यावतीनं करण्यात आली. त्यामुळे लवकरच नाशिकचा हा पॅटर्न राज्यातील इतर शहरांमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केल्यास कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल, असंही सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

नांदेडचा गुरुद्वारा परिसर कंटेन्मेंट झोन, 20 जणांना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

चंद्रपुरात हजारो मजुरांची धडकी भरवणारी गर्दी, मजुरी नाही, रेशन संपल्याने प्रवास करु देण्याची मागणी

लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर

Special trains for labour from Nashik

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.