Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Strike : एसटी महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती सुरू, आत्तापर्यंत 52 जणांना केलं नियुक्त

एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कर्मचाऱ्यांनी मागच्या पाच महिन्यापासून संप (ST Strike) पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य देखील केल्या आहेत. पण कर्मचारी त्यांच्या मागण्यारती ठाम असल्याने अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही.

ST Strike : एसटी महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती सुरू, आत्तापर्यंत 52 जणांना केलं नियुक्त
एसटी महामंडळाची कंत्राटी पद्धतीने भरती सुरूImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:24 AM

रत्नागिरी – एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कर्मचाऱ्यांनी मागच्या पाच महिन्यापासून संप (ST Strike) पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य देखील केल्या आहेत. पण कर्मचारी त्यांच्या मागण्यारती ठाम असल्याने अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. हा संप कधी मागे घेतलाा जाईल याची शाश्वती नसल्याने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली आहे. रत्नागिरी आत्तापर्यंत 52 जणांना नियुक्त केलं आहे. त्यांना कामावर घेताना एक वर्षाचा करार देखील केला आहे. विशेष म्हणजे ज्यांना कंत्राटी पद्धतीने घेतलं आहे. त्यांना दोन दिवसाचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी एसटीच्या सेवेसाठी कार्यरत होतील. आझाद मैदानात (Azad Maidan) आज एसटीचं आंदोलन आक्रमक करण्यासाठी अनेक कर्मचारी दाखल दाखल झाले आहेत.

नांदेडचे 300 कर्मचारी मुंबईत दाखल

नांदेडमध्ये संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई इथल्या आझाद मैदानाकडे कुच केली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. रात्री जवळपास तीनशेच्या सुमारास एसटी कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर हे कर्मचारी ठाम असून त्यासाठी मुंबईत आता तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी जाहीर केलं आहे. राज्यातील एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी अजूनही आझाद मैदानात तळ ठोकून आहेत. त्यामुळे पुन्हा कर्मचारी तिथं यायला सुरूवात झाल्याने राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

कामावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार

मागील पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना अनेकदा कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत हजर राहण्याचे आदेश अनिल परब यांनी दिले होते. जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाही त्यांनी कारवाईला सामोरे जावे असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील कामावर हजर न राहिल्यास कारवाई करणार असं म्हटलं होतं. पण आझाद मैदानात पुन्हा एकदा कर्मचारी यायला जमायला सुरूवात झाल्याने आंदोलन आणखी तीव्र होईल असं वाटत आहे.

काँग्रेसचे आमदार सोनिया गांधींना भेटणार, मुख्यमंत्र्यांसह स्वपक्षाच्या मंत्र्यांची तक्रार करणार? नेमकं काय घडणार?

Netresh Sharma : करौली हिसांचारात आगीत अडकलेलं कुटुंब, तिघांचा जीव वाचवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या धाडसाची देशभर चर्चा

Real Estate | घराचं स्वप्न आवाक्याबाहेर; घर खरेदी का झाली महाग? घेऊयात जाणून

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.