रत्नागिरी – एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कर्मचाऱ्यांनी मागच्या पाच महिन्यापासून संप (ST Strike) पुकारला आहे. कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य देखील केल्या आहेत. पण कर्मचारी त्यांच्या मागण्यारती ठाम असल्याने अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. हा संप कधी मागे घेतलाा जाईल याची शाश्वती नसल्याने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली आहे. रत्नागिरी आत्तापर्यंत 52 जणांना नियुक्त केलं आहे. त्यांना कामावर घेताना एक वर्षाचा करार देखील केला आहे. विशेष म्हणजे ज्यांना कंत्राटी पद्धतीने घेतलं आहे. त्यांना दोन दिवसाचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी एसटीच्या सेवेसाठी कार्यरत होतील. आझाद मैदानात (Azad Maidan) आज एसटीचं आंदोलन आक्रमक करण्यासाठी अनेक कर्मचारी दाखल दाखल झाले आहेत.
नांदेडमध्ये संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई इथल्या आझाद मैदानाकडे कुच केली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. रात्री जवळपास तीनशेच्या सुमारास एसटी कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर हे कर्मचारी ठाम असून त्यासाठी मुंबईत आता तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी जाहीर केलं आहे. राज्यातील एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी अजूनही आझाद मैदानात तळ ठोकून आहेत. त्यामुळे पुन्हा कर्मचारी तिथं यायला सुरूवात झाल्याने राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
मागील पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना अनेकदा कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत हजर राहण्याचे आदेश अनिल परब यांनी दिले होते. जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाही त्यांनी कारवाईला सामोरे जावे असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील कामावर हजर न राहिल्यास कारवाई करणार असं म्हटलं होतं. पण आझाद मैदानात पुन्हा एकदा कर्मचारी यायला जमायला सुरूवात झाल्याने आंदोलन आणखी तीव्र होईल असं वाटत आहे.