शुक्रवारपासून लालपरीच्या प्रवासासाठी मोजावे लागणार जादा भाडे!
येत्या शुक्रवार पासून म्हणजे 21 ऑक्टोबर पासून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार असून दिवाळीत प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
नाशिक : दिवाळीच्या ( Diwali Festival) पार्श्वभूमीवर एसटी ( ST ) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या ( Nashik ) एसटी विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे. जवळपास दहा ते पंधरा टक्के इतकी ही वाढ झाली आहे. येत्या शुक्रवार पासून म्हणजेच 21 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यन्त जादा भाडे मोजावे लागणार आहे. नाशिक विभागात जाणाऱ्या बसेस बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी दिवाळीत ही भाडेवाढ केली जाते. कोरोनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाचे झालेले नुकसान बघता ही मोठी तुट भरून काढण्याचे मोठे आव्हान राज्य शासनापूढे निर्माण झालेले असतांना एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे एसटीचा मोठा तोटा झाला होता. त्यात आता दिवाळी तोंडावर असताना परिवर्तनशील भाडे आकारणी संदर्भात एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळीत दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते त्यानुसार नाशिक विभागाने सविस्तर परिपत्रक जारी केले आहे.
येत्या शुक्रवार पासून म्हणजे 21 ऑक्टोबर पासून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार असून दिवाळीत प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
एसटी प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी साधारणतः दहा रुपये तर आंतरजिल्हा प्रवास चाळीस ते पन्नास रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे.
नाशिक विभागातील दिवाळी हंगामात दर खालीलप्रमाणे आकारले जाणार आहे. त्यात साधी बस आणि शिवशाही बस असे दर आहेत. कळवण ते नाशिक 125 – 135 येवला ते नाशिक 130 – 145 लासलगाव ते नाशिक 105 – 115 नाशिक बोरिवली 270 – 400 – 300 – 445 नाशिक ते औरंगाबाद 295 – 440 – 325 – 485 नाशिक ते धुळे 235 – 350 – 260 – 390 नाशिक ते मुंबई 270 – 400 – 300 – 445