ST News : एसटी महामंडळाच्या या बस स्थानकात ‘हिरकणी कक्षा’ची स्थापना, महिला प्रवाशांसाठी प्रथमच एसी बेबी फिडींग सेंटर

मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन समितीने मुंबई शहरात गर्दीच्या ठिकाणांवर एकूण 17 हिरकणी कक्ष मंजूर केले आहेत. या 17 हिरकणी कक्षांपैकी एसटी महामंडळाच्या पाच बस स्थानकात ही सोय उपलब्ध होईल.

ST News : एसटी महामंडळाच्या या बस स्थानकात 'हिरकणी कक्षा'ची स्थापना, महिला प्रवाशांसाठी प्रथमच एसी बेबी फिडींग सेंटर
hirkani centreImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 1:02 PM

मुंबई : एसटी महामंडळाच्या ( MSRTC ) पाच बस स्थानकावर महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या सहकार्याने स्तनदा मातांसाठी पाच ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. मुंबई जिल्हा महिला व बालकल्याण समिती मार्फत ( mumbai central ) मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर वातानुकूलित ‘हिरकणी कक्षां’ची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे महिला प्रवाशांना त्यांच्या तान्ह्या बाळासाठी ‘फिडींग रूम’ ( baby feeding room )  उपलब्ध होणार आहे.

एकूण 17 ठिकाणांवर ‘हिरकणी कक्ष’

सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत. त्यामुळे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने एसटी महामंडळाला एकूण 17 ठिकाणांवर ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर येथे सुविधा

मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन समितीने मुंबई शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा एकूण 17 हिरकणी कक्ष मंजूर केले आहेत. या 17 हिरकणूी कक्षांपैकी एसटी महामंडळा्च्या पाच बस स्थानकापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बस स्थानक या तीन बस स्थानकावर हिरकणी कक्षांची उभारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.

150 चौरस फूटांचे वातानुकूलित कक्ष

मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बसस्थानकांत प्रत्येकी 150 चौरस फूटांचे वातानुकूलित हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहीती एसटी महामंडळाची सूत्रांनी दिली आहे. तसेच एसटी महामंडळीच्या कुर्ला नेहरूनगर बस स्थानकातही हिरकणी कक्ष उभारण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.