ST News : राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत सुविधा

पंढरपूरात राज्यातील पहिले बस स्थानक कम निवास व्यवस्था असलेल्या बस स्थानकाचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.

ST News : राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत सुविधा
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 12:48 PM

पंढरपूरच्या आषाढी यात्रे निमित्ताने राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर हे राज्यातील पहिले 34 फलाटांचे अति भव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि त्याला जोडूनच 1 हजार यात्रेकरू एकावेळी राहतील अशा यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी ( 17  जुलै) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर येथे एसटी महामंडळाचे अद्यावत बस स्थानक आहे. या शेकडो बसेस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने-आण करतात. तथापि, आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे 1हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी 2 सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी 33 कोटी रुपये खर्च आला आहे. या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार  आहे.

500 एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था

या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली असून याबरोबरच सुमारे 1 हजार यात्रेकरू देखील राहतील, असे भव्य यात्री निवास बांधण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.