ST workers’ agitation : चाकारमान्यांची उन्हाळी सुटी जोरात, 22 एप्रिलपासून एसटी पुन्हा धावणार; 70 हजार कर्मचारी कामावर हजर
तुम्ही देखील उन्हाळ्याच्या (summer) सुटीमध्ये आपल्या मुलांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करणार असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचा प्रवास सुखर करणारी आणि प्रवासात सुरक्षेची हमी देणारी लालपरी अर्थात बस (STBUS) पुन्हा एकदा 22 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने चालू होत आहे.
मुंबई : तुम्ही देखील उन्हाळ्याच्या (summer) सुटीमध्ये आपल्या मुलांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करणार असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचा प्रवास सुखर करणारी आणि प्रवासात सुरक्षेची हमी देणारी लालपरी अर्थात बस (STBUS) पुन्हा एकदा 22 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने चालू होत आहे. एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे प्रवासातील अडचण दूर होणार आहे. गेल्या साडेपाच महिन्यांपासून एसटी सेवा ठप्प होती. एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे (passengers) हाल झाले. खासगी वाहतूकदारांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ आली. मात्र आता लवकरच ही अडचण दूर होणरा आहे. आतापर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 70 हजार कर्मचारी ड्यूटीवर हजर झाले आहेत. काल मंगळवारी 7,435 कर्मचारी कामावर परतले त्यामुळे आता पुन्हा एकदा एसटी सुसाट धावणार आहे. ग्रामीण भागात एसटीला जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील वाहतूक ही पूर्णपणे एसटीवर अवलंबून असते.
एसटीच्या ताफ्यात 15 हजार गाड्या
सध्या एसटीच्या ताफ्यामध्ये एकूण 15 हजार गाड्या आहेत. आधी कोरोनामुळे आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे वर्षभर बस सेवा बंद होती. त्यामुळे यातील अनेक गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे. या गाड्यातील बिघाड दुरुस्त करून पुन्हा एकदा त्यांना प्रवाशांच्या सेवेत हजर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच एसटीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी, एलएनजी गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. एकूणच एसटी आता आपले रुपडे पालटताना दिसत आहे.
सत्तर हजार कर्मचारी कामावर हजर
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली होती. संप पुकारला होता. या संपाला आता साडेपाच महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या तरी देखील संप सुरूच होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कर्मचारी कामावर हजर होत असून, मंगळवारी 7,435 कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली असल्याने आता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 69,082 वर पोहोचली आहे. यामध्ये 24 हजार ड्रायव्हर तर 19,500 कंडक्टरचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
Volvo Car: आलिशान वोल्वो कारची किंमत तब्बल तीन लाखांनी वाढली! आता नेमकी किंमत किती? जाणून घ्या
Sagwan Farming : या झाडाची लागवड करून झटपट व्हा श्रीमंत, काही वर्षांतच बनणार करोडपती !