Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Worker Protest : एवढं धाडस येतं कुठून? आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू, अजित पवारांचा इशारा कुणाला?

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्तेंचे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर राष्ट्रवादीही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राज्यभर आदोलनं करत आहे. अशात राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कडकडीत इशारा दिला आहे.

St Worker Protest : एवढं धाडस येतं कुठून? आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू, अजित पवारांचा इशारा कुणाला?
आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू-अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:39 PM

कोल्हापूर : राज्यात सध्या सगळीकडे एकच प्रकरण गाजतंय ते म्हणजे शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक आदोलन(St Workers Agitation) , यावर आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उलटू लागल्या आहेत. याच प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्तेंचे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर राष्ट्रवादीही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राज्यभर आदोलनं करत आहे. अशात राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कडकडीत इशारा दिला आहे. चिथावणी खोर भाषण कोण देतो हे सर्वांनी पाहिलंय आणि न्यायालयाच्या निकालाची तंतोतंत अंमलबजावणी होईल असं सरकारने सांगितले होतं, मग अचानक हे आंदोलन कसासाठी झालं? एवढं धाडसं येतं कुठून? या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधून काढू, असे म्हणत इशारा दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

पवार साहेबांच्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. एवढे मोठे धाडस करण्यामागे नक्की कोणतरी मास्टर माईंड असला पाहिजे. त्याला शोधून काढू. हे कुणाच्याच बाबतीत घडता कामा नये. याच्या शेवट पर्यंत जाऊन महाराष्ट्रात दूध का दूध पानी का पानी करू, असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच हे पोलिसांचेही एकप्रकारे अपयश आहे. इतरांना याची माहिती असली पाहिजे. पोलीस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. 12 तारखेला आंदोलन करणार असं काहीजण बोलेल होते, असे म्हणत त्यांनी पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही इशारा

याच आंदोलनावरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कडकडीत इशारा दिला आहे. राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात.

Gunratna Sadavarte : माझी हत्या होऊ शकते, गावदेवी पोलीस ठाण्यातून गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

St Workers Agitation : शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनाचा भाजपकडून निषेध, फडणवीसांपासून ते शेलारांपर्यंत नेते म्हणतात…

ST Andolan Mumbai : शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक! परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.