shivena : शिवसेना फुटीनंतर पदाधिकाऱ्यांनी घेतली धास्ती, शिवसेनेचा नवा प्लॅन
तिदमेंच्या प्रवेशाने सेना पदाधिकाऱ्यांना धक्का बसला तसेच प्रवेश केल्या केल्या त्यांना शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख पद देण्यात आल्याने शिवसेना पदाधिकऱ्यांनीही याची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक तथा म्यूनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे (Pravin Tidme) हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडून भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. तसेच मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर आता आम्हीच खरी शिवसेना असल्याचे प्रत्येक मेळाव्यात आणि भाषणात सांगत आहे. यामुळे राज्यातील अनेक सेना पदाधिकारी शिंदे गटात जात आहे. आता नाशिकमध्ये देखील याचे पडसाद उमटत आहे. राज्यातील अनेक सेना पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होत असताना नाशिकमधील शिवसैनिकांनी मात्र ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. नाशिकमधील शिवसेना मजबूत आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांचे शिवसेना प्रवेश देखील घडवून आणले होते.
मात्र,तिदमेंच्या प्रवेशाने सेना पदाधिकाऱ्यांना धक्का बसला तसेच प्रवेश केल्या केल्या त्यांना शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख पद देण्यात आल्याने शिवसेना पदाधिकऱ्यांनीही याची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील सर्व माजी नगरसेवकांच्या घरी शिवसेना पदाधिकारी भेटी देत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनतंर तीन महिने टिकून राहिलेला शिवसेनेच्या गडाला आता हादरे बसण्यात सुरुवात झाली.
हा गड शाबुत राहण्यासाठी शिवसेनेचे उपनेते सुनिल बागुल, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,
यांनी नाशिक रोड येथील माजी नगरसेवक सिमा ताजणे, मंगला आढाव, रंजना बोराडे, ज्योती खोले, प्रशांत दिवे, रमेश धोंगडे, सुर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, सुनिता कोठूळे, केशव पोरजे, संतोष साळवे,योगेश गाडेकर यांचे घरी जावून भेट घेतली आहे.
तिदमे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे सतरा माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे.
खासदार गोडसे शिंदे गटात गेल्याने त्यांनी अनेकांना फोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचीच धास्ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
त्यामुळे आता शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम राबवून शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.