बारावीची परीक्षा, अफवांचं पीक, काय खरं ? काय खोटं ? परीक्षा मंडळ काय म्हणालं ?

दहावी, बारावीच्या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जाते. या परीक्षांच्या निकालावर पुढच्या आयुष्याची दिशा ठरते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा महत्वाच्या असतात. आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. सर्व विद्यार्थी त्यासाठी सज्ज झाले आहेत. कसून तयारी, रिव्हिजन सगळं करून आता विद्यार्थी पेपर देण्यासाठी तयार आहेत

बारावीची परीक्षा, अफवांचं पीक, काय खरं ? काय खोटं ? परीक्षा मंडळ काय म्हणालं ?
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 9:09 AM

मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : दहावी, बारावीच्या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जाते. या परीक्षांच्या निकालावर पुढच्या आयुष्याची दिशा ठरते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा महत्वाच्या असतात. आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. सर्व विद्यार्थी त्यासाठी सज्ज झाले आहेत. कसून तयारी, रिव्हिजन सगळं करून आता विद्यार्थी पेपर देण्यासाठी तयार आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात येणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून विद्यार्थी पालकांना करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा आज, अर्थात २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असून १९ मार्च २०२४ पर्यंत होणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दिनांक २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर इयत्ता १० वीची, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रची लेखी परीक्षा दिनांक १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

मात्र १२ वी व १० वी च्या परीक्षे दरम्यान विविध माध्यमांद्वारे तसेच सोशल मिडीयावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम वाढतो, चिंता वाटू लागते. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे. तसेच अशा अफवा किंवा विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक सज्ज

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, बुधवारपासून सुरू होत असून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे शूटिंग करण्यात येणार असून वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडेल. यंदा विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.