मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ज्यांच्या तोंडी साखर…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमणं
कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
पुणे : राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमणं उधळली आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असे जेष्ठ नेते शरद पवार असा उल्लेख करून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. यावेळी जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, ऊस शेती, साखर उद्योगासाठी समर्पित असणारी देशातील एकमेव संस्था असणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे.
ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते शरद पवार, जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते, अधिवेशनात जयंत पाटलांची आठवण काढून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.
मी देखील दावोसला जाऊन आलो आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे, कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
राज्याला मदत होण्यासाठी शरद पवार सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात, सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, आज ज्यांचा सम्मान होणार आहे, त्यांच्यामुळे साखरेचे साम्राज्य उभं राहणार आहे.
देशाच्या विकासात या उद्योगाचे योगदान मोठे आहे, 100 टक्के इथोनॉल वापर करणारे वाहन तयार होतील मत व्यक्त करत सहकार क्षेत्रात अंतिम शब्द हा शरद पवारांचा मानला जातो असेही शिंदे म्हणाले.
या क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी सहकार मंत्रालय तयार करण्यात आले आहे. ज्या ज्या वेळी अमित शहा भेटत असतात त्यावेळी साखर कारखाण्याच्या समस्या मांडत असतात, केंद्र सरकार आपल्यासोबत आहे असं सांगायला देखील शिंदे विसरले नाहीत.
ऊस क्षेत्रात ठिबक सिचनाचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे, त्यासाठी राज्य सरकार प्रयन्त करणार असून कोरोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे.
हा उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, कारण यावर लाखो शेतकरी अवलंबून आहेत, जगात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र अजून प्रयन्त केला तर पुढे येणार आहे.
शरद पवारांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता आहे, त्यांचा गाढा अभ्यास देखील आहे, शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे ज्याचा सहकार क्षेत्राला,कृषी क्षेत्राला आणि सरकारला फायदा होणार असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहे.