रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय (SSC Geography paper marks) घेतला आहे.

रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 3:08 PM

पुणे : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय (SSC Geography paper marks) घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाला गुण दिले जाणार आहेत.  (SSC Geography paper marks)

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने याबाबतची माहिती दिली. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत.

राज्यात दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान नियोजित होती.  सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र कोरोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली.

याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाऊन सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत वाढवल्याने त्यावेळी भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं आहे.

(SSC Geography paper marks)

संबंधित बातम्या  

SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.