आमदार स्थानिक विकास निधीमध्ये वाढ, विकास होणार की परिस्थिती जैसे थे?
रकारच्या या नव्या आदेशानंतर आता आमदारांना स्थानिक वाकासासाठी तीन कोटी रुपये मिळणार आहेत. (state government mla local development fund )
मुंबई : कोरोना संसर्गामुळे राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात घडला असला तरी, राज्य सरकारने आमदारांच्या विकास निधीमध्ये (MLA development fund) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या नव्या आदेशानंतर आता आमदारांना स्थानिक विकासासाठी तीन कोटी रुपये मिळणार आहेत. (State government increased MLA local development fund by one crore)
निर्णय काय?
मदतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमदारांना स्थानिक विकास निधी म्हणून पूर्वी 2 कोटी रुपये दिले जायचे. मात्र, बांधकाम व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विकास निधी देणे शक्य झाले नव्हते. एका वर्षानंतर अजित पवार यांनी या अश्वासनाची पूर्तता करत आमदारांच्या विकास निधीमध्ये 1 कोटी रुपयांनी वाढ केली आहे. नव्या निर्णयानुसार आता आमदारांना स्थानिक विकासासाठी 3 कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे.
विकास होणार की परिस्थिती जैसै थे?
एकदा निवडून आले की लोकप्रतिनिधी मतदारसंघाकडे लक्ष देत नाहीत असा आरोप सर्रास होते. तसेच आमदारकीच्या कार्यकाळात आमूक नेत्याने काहीच काम केले नाही, असा आरोप अनेकजण करतात. हा मुद्दा लक्षात घेऊन, मतदासंघांच्या विकासासाठी निधी कमी पडू नये म्हणून अजित पवार यांनी आमदार स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटी रुपयांची वाढ केली आहे. मात्र, या निधीतून तेवढ्याच क्षमतेने विकासकामे केली जाणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्हा वार्षिक योजना राबविताना स्थानिक लहान कामांना आवश्यक असलेला निधी जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या लहान कामांमध्ये शौचालयांचे बांधकाम, व्यायामशाळांचे बांधकाम, स्मशानभूमीची कामे, बसथांबा बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम या कामांचा समावेश आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Corona Update : राज्याची चिंता वाढली, दिवसभरात 6 हजार नवे कोरोना रुग्ण; आकडा वाढला, निर्बंधही वाढणार?
तू माझा छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेन, पत्नीच्या धमकीनंतर पतीचं भयानक कृत्य
(State government increased MLA local development fund by one crore)