मोठी बातमी! ‘तीन महिन्यांत राज्यातलं सरकार कोसळणार’; शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा खळबळजनक दावा

राज्यात ईव्हीएमवरून आरोप -प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

मोठी बातमी! 'तीन महिन्यांत राज्यातलं सरकार कोसळणार'; शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा खळबळजनक दावा
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 6:15 PM

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजपला राज्यात सर्वाधिक 132 जागा मिळाल्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जातं आहे. लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्यांना ईव्हीएमवर शंका नव्हती मात्र आता विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे, असं उत्तर महायुतीकडून महाविकास आघाडीला देण्यात येत आहे. ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार उत्तमराव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपुरात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जानकर? 

‘तीन महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहे, त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल. सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार’ असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हानही मी स्विकारतो या देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी झाल्या आहेत, त्यामुळे तीन आरोपी फरार आहेत.  आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक करणे अपेक्षित होते, मात्र तो हजर झाला ही पोलिसांसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. आकाच्या मागे कोण आहे? हे गृह विभागाने शोधून काढावे, जर त्यांना सापडत नसेल तर गृह खातं माझ्याकडे द्या, मी सगळं शोधून काढतो असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.