राज्य सरकार कारगिल विजयदिनी ‘उरी’ चित्रपट फुकटात दाखवणार

राज्यातील तरुणांना 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

राज्य  सरकार कारगिल विजयदिनी 'उरी' चित्रपट फुकटात दाखवणार
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 3:29 PM

पुणे: राज्यातील तरुणांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट कारगिल विजयदिनी म्हणजेच 26 जुलैला सकाळी 10 वाजता दाखवण्यात येईल.

राज्य सरकारने राज्यातील चित्रपटगृहांना 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजताचा एक शो मोफत दाखवण्यास सांगितले आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुण याचा लाभ घेऊ शकणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटगृहाचे चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासोबत नियोजनासाठी बैठक घ्यावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.

उरी चित्रपट मोफत दाखवण्यामागे तरुणांमध्ये भारतीय सैन्याबद्दल अभिमान आणि आदर वाढावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने ‘हाउज द जोश’ ही घोषणाही प्रसिद्ध केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहापासून संसदेपर्यंत ही घोषणा गाजली. या चित्रपटानेच विकी कौशलची लोकप्रियता प्रचंड वाढली. दहशतवाद्यांकडून भारतावर होणारे हल्ले आणि त्यावर भारतीय सैन्याने घेतलेली आक्रमक भूमिका याला केंद्रभागी ठेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला होता. याला देशभरातून प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिली होता.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.