नागपूर मनपाकडे दोनच दिवसांचा कोरोना लसीचा साठा, लसीच्या तुटवड्याची शक्यता
नागपूर मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा राहिला आहे. त्यामुळे लसीच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. | nagpur Corona Vaccine
नागपूर : नागपूर मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा (Storage of Corona Vaccine) राहिला आहे. त्यामुळे लसीच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना त्या तुलनेत आता लसीचा साठा उपलब्ध नाहीय. (stock of corona vaccine in two days possibility of vaccine shortage in nagpur)
नागपूर मनपाकडे किती लसीचे डोज?
सध्याच्या परिस्थितीत नागपूर मनपाकडे 18 ते 20 हजार कोरोना डोज आहेत. शहरात दररोज 10 हजारच्या आसपास डोज लागतात. त्यामुळे पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे.
राज्य सरकारकडे अडीच लाख डोजची मागणी
नागपूर महापालिकने सद्य परिस्थितीत राज्य सरकारकडे अडीज लाख डोजची मागणी केली आहे. राज्य सरकारने हे डोज दिल्यानंतर लसीकरणाला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागांत काय चित्र?
ग्रामीण भागांत तर शहरी भागाहून अधिक वेगळी परिस्थिती आहे. ग्रामीण भागांत तर केवळ 5 हजार डोज शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या लोकांना सध्या लस घ्यायची आहे त्यांना आणखी काही काळ वाट बघायला लागण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला चांगला प्रतिसाद
तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरण केंद्रावर एकच गर्दी उसळली आहे. लसीकरणाचा वेळ तसंच लसीकरणाची केंद्रे वाढवल्याने लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे.
लसीकरण कुठे सुरु?
सध्या 18 शासकिय आणि 37 खासगी केंद्रावर लसीकरण सुरु आहे. साधारणपणे दररोज 10 हजार लाभार्थ्यांना लस दिली जाते.
नागपुरात कोरोनाची काय परिस्थिती?
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या घटल्या आहेत. अशा परिस्थिती रुग्ण वाढले असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात पाठीमागच्या 24 तासांत अवघ्या 6 हजार 614 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर रुग्णांचं प्रमाण मात्र अधिक आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 272 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झालीय. तर गेल्या 24 तासांत 11 मृत्यूची नोंदही झालीय.
रुग्णसंख्येला आळा घालण्याचं प्रशासनामोर आव्हान
कोरोना रुग्णांचं सद्यस्थितीत प्रमाण पाहता नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या 11 हजारांवर पोहोचली. या रुग्णसंख्येला आळा घालण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
(stock of corona vaccine in two days possibility of vaccine shortage in nagpur)
MNS Party Anniversary | किल्ल्याचा बुरुज, उगवता सूर्य आणि उंच भरारी घेणारा पक्षी, राज ठाकरेंचे नवं ट्वीटhttps://t.co/szGfbrFmEp #MNS #RajThackeray #MNS @RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
हे ही वाचा :