मिरवणुकीत आधी लाईट घालवली, त्यानंतर दगडफेक, नंतर प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्या; जळगाव जामोदमध्ये नेमकं काय घडलं ?

देशभरात गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. काल गणेशाचे अत्यंत थाटात विसर्जनही करण्यात आले. हे विसर्जन सुरू असतानाच काल बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजा मोदमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने जळगावजामोदमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

मिरवणुकीत आधी लाईट घालवली, त्यानंतर दगडफेक, नंतर प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्या; जळगाव जामोदमध्ये नेमकं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 12:49 PM

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये रात्रभर तणाव आहे. जळगाव जामोदमध्ये काल रात्री गणपती विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली. लाईट घालवून ही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे एकच अफरातफर माजली. परिणामी पोलिसांना भक्तांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरीही भक्त ऐकेनात म्हणून पोलिसांना हवेत प्लास्टिकच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यामुळे सर्वच पांगले. या प्रकारामुळे जळगावजामोदमध्ये रात्रभर तणाव होता.

जळगाव जामोदच्या वायली वेस भागातील चौभारा परिसरात हा प्रकार घडला. रात्री 9 वाजता जल्लोषात गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. सर्वजण ढोलाच्या तालावर नाचत, गुलाल उधळत गणपती बाप्पाचा जयजयकार करत होते. या रॅलीत महिला आणि तरुण मुलीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. तेव्हा अचानक गावातील लाईट गेली. त्याचवेळी अचानक मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. एका उंच इमारतीच्या खिडकीतून ही दगडफेक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्या

दगडफेक झाल्याने गणेशभक्तांनीही प्रत्युत्तर म्हणून दगडे भिरकावली. त्यामुळे एकच पळापळ आणि धावपळ सुरू झाली. काहींनी तर वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे या समावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे जमाव अधिकच खवळला. आणखी वाहनांची तोडफोड सुरू झाली. जमाव बेकाबू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत प्लास्टिकच्या गोळ्यांचे पाच राऊंड फायर केले.

ठिकठिकाणी बंदोबस्त

तब्बल 150 ते 200 लोक अचानक समोर आल्याने पोलिसांना प्लास्टिकच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यामुळे जमाव पांगला. या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकासन झाले आहे. त्यानंतर गावातील 15 गणपती मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या समाजकंटकाला पकडले जात नाही, तोपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही, अशी मंडळांनी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. पोलीस या मंडळांना रात्रभर समाजावत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात रात्रभर तणावाचे वातावरण होते. जळगावजामोदमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज ईद असल्याने या गावातील बंदोबस्त अधिकच वाढवण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणूक थांबली

गणपती विसर्जन सुरू होऊन 12 तास उलटले तरी अजूनही जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणूक थांबलेली आहे. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत विसर्जन होणार नाही, अशी भूमिका मंडळांनी घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. काल झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस आणि गणेशभक्त जखमी झाले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.