इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, कोल्हापूर-सांगली महापालिकेकडून युद्धपातळीवर मोहिम सुरु

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, कोल्हापूर-सांगली महापालिकेकडून युद्धपातळीवर मोहिम सुरु (Stray dogs attack civilians in ichalkaranji)

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, कोल्हापूर-सांगली महापालिकेकडून युद्धपातळीवर मोहिम सुरु
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 1:06 PM

इचलकरंजी : इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, गेल्या आठवडाभरात शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांना चावा घेतला असून यात काही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. येथील नागरिक वारंवार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती नगरपालिकेकडे करीत आहेत, मात्र आरोग्य प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. (Stray dogs attack civilians in ichalkaranji)

आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही कुत्र्यांची दहशत

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघातील दत्तवाड गावात मोकाट कुत्र्यांनी गेल्या एक महिन्यापासून दहशत माजवली आहे. गावातील शेतकरी सातगोंडा आन्नू नुले(56) हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी चार कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्याने मोठमोठ्याने आरडाओरडा केला असता एका तरुणाने धाव घेत शेतकऱ्याची सुटका केली. दत्तवाडमध्ये सोमवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात अप्पासो अंबुपे यांचा जागीच मृत्यू झाला सदर दुपारची घटना ताजी असताना रात्रीच्या सुमारास इथल्याच शेतातील एका गोठ्यात बांधलेल्या म्हशींवर कुत्र्यांनी हल्ला करून म्हशीला ठार मारले यामुळे गावात खळबळ माजलीय. भटक्या कुत्र्यांकडून वारंवार होत असलेल्या हल्ले पाहता या कुत्र्यांना पकडू नका, ठार मारा अशी मागणी गावकरी करीत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होणे आणि मरण पावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

राज्यमंत्र्यांनी घेतली दत्तवाड ग्रामस्थांची भेट

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दानवाड दत्तवाड ग्रामस्थांची भेट घेतली असून कोल्हापूर, सांगली नगरपालिकेचे डॉग स्कॉड पाचारण करण्यात आलेत. तसेच या भागात वजीर रेस्कु फोर्स ही मदतीला आले आहे. याचीच दखल घेऊन प्रशासनाकडून सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या करवी कुत्री पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यामुळेच बिथरलेल्या कुत्र्यांनी पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावरही हल्ला करण्याचे काम सुरू केले आहे. कुत्री पकडण्याच्या मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिकेचा शुभम ठाकूर नावाचा कर्मचारी जखमी झाला आहे. पाठलाग करून कुत्रे पकडत असताना अचानक त्रयस्थ कुत्र्यांनी हल्ला केल्याने घात होता होता टळला. वेळीच जवळ असणाऱ्या साथीदारांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला.

सर्वत्र भटक्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाच्या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्री येथील नाईक मळा, संत मळा व तांबेमाळ परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण करत 10 ते 15 जणांचा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या चार जणांवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये तर उर्वरित नागरिकांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. यामध्ये एक वृद्ध महिलेसह अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. एका वृद्धाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. इचलकरंजीत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. वाहनांच्या मागे लागणे, सायकलवरून व चालत जाणार्‍या कामगारांचा पाठलाग करून चावणे अशा घटना रोज घडत आहेत. रात्रपाळीत काम करणार्‍या कामगारांना चहाला जाण्यासाठीही अडचण ठरत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली नागरिकांना वावरत आहेत.

गुरुकन्नन नगर परिसरातही कुत्र्यांचा उच्छाद

भटक्या कुत्र्यांनी सर्वत्र उच्छाद मांडला असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. गुरुकन्नव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांसह सुमारे 10 ते 12 जणांचा चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखणी झालेल्या लोकांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे रेबिजची लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड झाली. (Stray dogs attack civilians in ichalkaranji)

Video : कारखाना ऊस तोड नसल्याने शेतकऱ्याने आपल्याच शेतातील ऊस पेटवला

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.