महाशक्ती बरोबर असेल तर… जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ठाकरे…
उद्धव ठाकरे यांनी नाशिकहून निघालेल्या लॉन्ग मार्चसह जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत असतांना पंचामृत अर्थसंकल्पावर सरकारला चिमटे काढले आहे.
मुंबई : शेतकरी लॉन्ग मार्च आणि जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पाहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर नाशिकहून मुंबईच्या दिशेने आदिवासी शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. तर दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहे. या दोन्ही संपामुळे शिंदे – फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल करत पंचामृत अर्थसंकल्पाचे दोन चार थेंब त्यांच्यावर शिंपडले असते तर बरं झालं असतं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारला टोला लगावला आहे.
सगळं काही दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करून टाकायचं आणि कोणी काही विरुद्ध बोललं की त्याला अडकून टाकायचे असे काम सरकार करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. यावेळी दिल्लीतील काही कार्यालये ही गुजरात आणि दिल्ली येथे हलविली जात असल्याचे म्हंटले आहे.
ज्यांना आपण अन्न दाता म्हणतो त्यांना इथे यावं लागतय ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांना काय हवं आहे हे आपण द्यायला पाहिजे. यापूर्वी देखील त्यांनी मोर्चा काढला होता. सरकारने त्यांच्या समस्या ऐकून घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे. कोरोनात त्यांनी जगाला जगवलं आता त्यांना मदत करायला पाहिजे म्हणत शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्चचे समर्थन केले आहे.
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले 2005 नंतर जो कायदा केला आहे. त्यामुळे निवृत्ती नंतरचे आयुष्य जगता येणार नाहीये. त्यांना त्यात काही अडचणी आहेत. त्यामुळे याबाबत विचार करायला पाहिजे होता. पण सरकार अजूनही करत नाही, पंचामृताचे शिंतोडे त्यांच्या शिंपडले तर बरं झालं असतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण मी एकच सांगतो. ही लढाई याच्यासाठी आहे, की देशात 75 वर्षे लोकशाही होती का? लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे. ही लढाई शिवसेनेची नाही. संपूर्ण देशाची आहे.
अटल बिहारी यांच्या सरकारने यांनी रद्द केली होती. पहिली योजना पुन्हा लागू करायला हरकत आहे. जुन्या योजनेचा भार होता त्यामुले देश काही 2005 साली जन्माला आलेला नाही. त्यामुळे जुन्या पेन्शनच्या बद्दल पुन्हा विचार करायला हरकत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.